निमोण सोसायटीच्या चेअरमनपदी निमोणचे दत्तात्रय सोनवणे तर व्हा.चेअरमनपदी डोंणगावचे हरीभाऊ शेळके बिनविरोध
चांदवड तालुक्यातील पुर्व भागातील निमोण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हा.चेअरमन पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत चेअरमनपदी निमोणचे दत्तात्रय मुरलीधर सोनवणे तर व्हा.चेअरमनपदी डोंणगावचे हरिभाऊ पांडुरंग शेळके यांची बिनविरोध निवड झाली आहे .
निमोण व डोणगांव या दोन गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या या सोसायटीमध्ये १३ पैकी ११ जागा शेतकरी विकास पँनलकडे असल्याने त्यांना स्पष्ट बहुमत होते.
यावेळी प्रमुख उपस्थितीत निमोण सोसायटीचे माजी चेअरमन कांतीलाल म्हातारबा निकम,डोणगावचे सरपंच जगदीश यशवंतराव शेळके , , डॉ. भावराव वाल्मिक देवरे यांच्यासह अनेक माजी पदाधिकारी व ग्रामस्थ व.शेतकरी विकास पँनलचे समर्थक हे निवडीप्रसंगी उपस्थित होते..
निमोण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने बाजी मारली होती . ११ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले होते. सोसायटीच्या १३ जागांसाठी निवडणूकीत अनुसूचित जाती गटातून पंडितराव सोनवणे हे अविरोध झाले होते . उर्वरित १२ जागांसाठी शेतकरी विकास व सहकार पॅनलमध्ये चुरशीची लढत झाली . मतदारांनी शेतकरी विकासला संधी दिली आहे . ११ जागांवर विजय मिळवत शेतकरी विकास पॅनलने सोसायटीची सत्ता काबीज केली होती . सभापती व उपसभापती निवड होताच समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला .
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून किशोर भालेराव यांनी काम पाहिले .त्यांना सहाय्य सचिव वालचंद राजोळे व लिपिक विलास देवरे यांनी केले. सोसायटी सभागृहात नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा सत्कार करण्यात आला .
निमोण सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळात रतन एकनाथ आहेर , राघो चेंडू ठाकरे , दिलीप विठ्ठल देवरे , वाल्मीक महादू शेळके , हरिभाऊ पांडुरंग शेळके , दत्तात्रय मुरलीधर सोनवणे , बाबूराव काळू सोनवणे , हिरामण कचरू सोमासे , गयाबाई कौतिक काळे , वत्सलाबाई हिरामण देवरे , शिवाजी काळू सोनवणे , अशोक बळवंत उगले हे निवडणूक आले होते तर , पंडितराव सोनवणे यांची अविरोध निवड झाली होती .

