आहुर्ली सोसायटीच्या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का, श्री.भैरवनाथ पँनलचा विजय
ईगतपुरी (नवनाथ गायकर)
आहुर्ली, वांजोळे व नांदडगाव या तीन्ही गावाचीं मिळुन असलेल्या आहुर्ली आदिवासी विविध विकास कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या अवघ्या तीन जागांसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत श्री.भैरवनाथ पँनलने दोन जागा मिळवत दणदणीत विजय प्राप्त केला आहे. या निवडणुकीत आजी माजी चेअरमन व गेल्या पाच सात वर्षांपासून सोसायटीवर वर्चस्व गाजवणार्या प्रस्थापित नेत्याचां अनपेक्षित पराभव झाला आहे. यात नवख्या व तरुण चेहर्यानीं बाजी मारत सोसायटीत एकप्रकारे परिवर्तन केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
अकरा सदस्यीय सोसायटीच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या अनु.जमाती प्रवर्गाच्या सहा जागा यापुर्वीच बिनविरोध झालेल्या आहेत.
पैकी बिगर आदिवासी कर्जदार खातेदार गटाच्या दोन जागांसाठी तर मागास प्रवर्ग राखीव एका जागेसाठी निवडणूक जाहीर झाली होती.
यात श्री.भैरवनाथ पँनल, प्रगती पँनल आमनेसामने रिंगणात होते.
दरम्यान मागास प्रवर्ग राखीव जागेवर जोरदार चुरस होती.विशेष म्हणजे ही लढत सोसायटीच्या तीन माजी चेअरमन यांच्यात रंगली होती.
या तिरंगी लढतीत खातळे भास्कर निव्रुत्ती यांनी खणखणीत विजय मिळवला. तर या गटातुन दोन्ही प्रतिस्पर्धी माजी चेअरमन यांना पराभव पत्करावा लागला.
बिगर आदिवासी कर्जदार खातेदार गटात तीन उमेदवार रिंगणात होते. या गटात दोन उमेदवारांना समसमान मते मिळाल्याने एका जागेसाठी चिठ्ठी काढण्यात आली. यात श्रीमती गायकर मथुराबाई काशिनाथ या विजयी झाल्या आहेत.
उर्वरित एका जागेवर प्रगती पँनलच्या उमेदवाराने विजय मिळवत खाते खोलले आहे.
दरम्यान या पँनलच्या विजयासाठी भाऊसाहेब गायकर, माजी सरपंच तुकाराम गायकर, रामदास वाजे , ग्रा.प.सदस्य रामदास गायकर , ज्ञानेश्वर गायकर , तुकाराम गायकर रंगनाथ पाटील खातळे , तानाजी खातळे , ज्ञानेश्वर खातळे ,विठ्ठल खकाळे , गणेश खकाळे आदीसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहे.
प्रगतीसाठी बांधील
आहुर्ली सह नांदडगाव व वांजोळे ही तिन्ही गावे शेतकरी बहुल व प्रगतीशील आहे. मात्र गेल्या दोन वर्षापासून शेतकरी मोठा अडचणीत असुन आगामी काळात शेतकर्याची चौफेर प्रगती करण्यासाठी आम्ही बांधील राहु अशी ग्वाही विजयी उमेदवार तथा माजी चेअरमन भास्कर खातळे व पँनलचे युवा नेते भाऊसाहेब गायकर यांनी विजयी सभेत बोलताना दिली आहे.

