[masterslider id="2"]
मुख्य बातमी विशेष लेख संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

अजब राजकारणाचा गजब नमुना : आहुर्ली येथील नवनिर्वाचित सोसायटी संचालकानीं दिला राजीनामा

संस्थेकडे सादर केलेले राजीनामे संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर वा नामंजूर होतील;पण यात अडचण अशी आहे कि चेअरमन, व्हा.चेअरमन निवडणुकीनंतरच सदर नवनिर्वाचित संचालक मंडळ कारभार करु शकेल व या राजीनाम्यावरही तदनंतर च विचार विनिमय होईल.

अजब राजकारणाचा गजब नमुना

आहुर्ली येथील नवनिर्वाचित सोसायटी संचालकानीं दिला राजीनामा

ईगतपुरी (नवनाथ गायकर )
एकवेळ दिल्लीचे राजकारण परवडले, पण गल्लीचे नको असे शहाणी मंडळी नेहमीच म्हणत असतात. कारण गावगुंडी राजकारण कधी कधी भलतेच टोकाला जाऊ शकते. याचाच प्रत्यंतर नुकताच आहुर्ली आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीच्या निमित्ताने येत आहे.
आहुर्ली आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच संपन्न झाली आहे.
यापुर्वी या सोसायटीतील अनु.जाती व जमाती साठीच्या सहा राखीव जागांवर सहा संचालक बिनविरोध निवडून आले होते. तर उर्वरित तीन जागांसाठी नुकतेच १५ मे रोजी मतदान होऊन निकाल जाहीर झाला होता.
आदिवासी बिगर कर्जदार खातेदार गटातुन दोन संचालक तर मागास प्रवर्ग गटातुन एक संचालक या निवडणुकीत निवडून आल्यानंतर संचालक मंडळाची एकुण संख्या नऊ झाली होती.

 पराभूत गटाने बिनविरोध निवडीत बाजी मारलेली होती. तर प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र पराभव पत्करावा लागल्याने बिनविरोध निवड झालेल्या सहा पैकी चक्क चार नवनिर्वाचित संचालकानीं आप-आपले राजीनामे संस्थेकडे सादर केल्याने प्रचंड खळबळ माजली आहे. नऊ पैकी चार संचालकानीं राजीनामे सादर केल्याने चेअरमन, व्हा.चेअरमन निवडणुकीवर याचा परिणाम होणार आहे.

विशेष म्हंणजे संस्थेकडे सादर केलेले राजीनामे संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर वा नामंजूर होतील;पण यात अडचण अशी आहे कि चेअरमन, व्हा.चेअरमन निवडणुकीनंतरच सदर नवनिर्वाचित संचालक मंडळ कारभार करु शकेल व या राजीनाम्यावरही तदनंतर च विचार विनिमय होईल.
एकुणच या चार संचालक मंडळाच्या राजीनाम्याने आहुर्ली सोसायटीचे राजकारणाने भलतेच वळण घेतले आहे.

लेखकाबद्दल

पत्रकार नवनाथ गायकर - इगतपुरी

एक टिप्पणी द्या