[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

निमोणला बिबट्याच्या जोडीने दर्शन दिल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

निमोणला बिबट्याच्या जोडीने दर्शन दिल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

चांदवड : निमोणला बिबट्याच्या जोडीने दर्शन दिल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही बिबट्यांचा वनविभागाने पिंजरा लावून बंदोबस्त करण्याची मागणी निमोण, वाद वराडी परीसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

मंगळवारी (ता. १७) डोंगरालगत शेती असलेल्या विष्णू काळे यांच्या जर्सी गायीचा फडशा या बिबट्याने पाडल्याचा संशय येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केला होता. सकाळी या परीसरातील शेतकरी मच्छिंद्र बाराहाते, कुंदन देवरे, गोरख सोनवणे, रतन सानप, बाळू सानप, वैभव देवरे, योगेश रायते, समाधान रायते, बाळू काळे आदींनी प्रत्यक्ष या दोन्ही बिबट्यांना पाहिले असल्याने अजूनच भितीचे वातावरण निर्माण
झाले आहे. यापूर्वीही कुंदन देवरे व इतर शेतकऱ्यांची जनावरे बिबट्याचे हल्ल्यात ठार झाली आहेत. यामुळे शेतकरी दहशतीत आहेत. वनविभागाने तत्काळ पिंजरा लावून या दोन्ही बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी निर्माण व परीसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी आपापली जनावरे सांभाळावी व आपण वनहद्दीत जाऊ नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

एक मोठा व एक लहान बिबट्या आम्ही आमच्या शेताजवळ पाहिला. आमचे शेत डोंगरालगत असल्याने सर्वजण बिबट्याच्या दहशतीत आहोत. वनविभागाने तत्काळ पिंजरा लावून या दोन्ही बिबट्यांचा बंदोबस्त करावा. – मच्छिंद्र बाराहाते, शेतकरी निमोण

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या