[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड चा अनोखा लोकोत्सव, देवी उत्सव , नवसाची आखाडी….

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

हा लोकोत्सव म्हणजे एकतेचा समानतेचा व जात धर्म विसरून एकोप्याने केला जातो… मुस्लीम धर्मिय देखील उत्सव समितीत सहभागी होतात…. मुळात या उत्सवाचे मुख्य आकर्षण आसलेले देवी-म्हसोबाचे सोंगातील…. म्हसोबाचे भक्त गनीभाई बागवान यांची आज्ञा झाल्याशिवाय म्हसोबाचे सोंग पूढे जात नाही… गनीभाई बागवान यांच्या घराण्याची व्यक्ती च्या हातून म्हसोबास टिळा दिल्यानंतर व खेलो महाराज असे त्यांनी म्हटल्यानंतर म्हसोबा देवतेचा आपोआपच सोंगात संचार होतो व ते सोंग पंन्नास पंन्नासा लोकांनाही आवरत नाही… मंडपाच्या पूढच्या बाजूने देवी चे सोंग निघते व मंडपात देवी म्हसोबाची भेट होताच देवी म्हसोबास कट्यारीचा स्पर्श करताच म्हसोबाची आलेली हवा शांत होते… अजून देवीच्या सोंगात दैवी शक्तीचा संचार असतोच …. मग भाविकभक्त देवीला केलेला नवास भेडतात व तत्पूर्वी उत्सव समिती देवी ला पूढील उत्सव कधी घ्यावा याबाबत कैल घेतात…. अशा पद्धतीने उत्सवाची सांगता होते

चांदवड चा अनोखा लोकोत्सव…. देवी उत्सव , नवसाची आखाडी….

प्रत्येक गावाची अनोखी अशी एक परंपरा असते , अनेक प्रकारचे उत्सव गावोगावी भरतात असाच अनोखा देवी उत्सव ( बोहाडा ) ऐतिहासिक व पौराणिक पार्श्वभूमी असलेले प्राचीन शहर चांदवड येथे भरतो . या शहराला एक फार मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. त्या परंपरेत चांदवड चा बोहाडा म्हणजे पारंपारिक देवी उत्सव / नवसाची आखाडी हा लोकोत्सव होय.

या लोकोत्सवाला नवसाची आखाडी असे म्हणतात , त्याचाही एक इतिहास आहे… सुमारे १०० ते १५० वर्षांची अखंड परंपरा या उत्सवाची आहे. जूने चांदवड म्हणजेच वरचेगांव येथिल जून्या नवघर गल्लीत पूरातन महादेव मंदिर आहे त्या मंदिरात महंत लालपूरी बाबांची संजीवन समाधी आहै. या लालपूरी महाराजांनी ही देवी येथे मंत्रशक्तीने आणली व या प्रसिद्ध लोकोत्सवाला सुरूवात झाली.

या लोकोत्सवातील ( आखाडी ) अनेक पौराणिक देवी-देवतां सोबत दैत्यांचे देखील सोंगे निघतात. ही सर्व सोंगे व त्यांची मोहाड ( मुखवटे ) मंत्रशक्तीने प्रभावित केली आहेत. महंत लालपूरी बाबांनी हा उत्सव वरचेगाव चांदवड येथील शिंपी गल्लीत उत्सवाची जागा मंत्राने भारावलेली आहे…. ज्यावेळेस वाजंत्री वाजते त्यावेळी या सोंगांमध्ये अनोख्या दैवी शक्ती प्रकटतात असा लोकांना विश्वास आहे… हा उत्सव कधी भरवायचा हे देवीच दरवेळी सांगत असते… त्यासाठी उत्सव समिती देवीला कौल लावते व ते विशिष्ट वर्ष ठरते त्यावेळीच उत्सव भरतो. या वर्षी तब्बल बारा ( १२ ) वर्षांनी म्हणजेच एक तपा नंतर हा उत्सव होत आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. वसपूर्तीसाठी देश विदेशातून दर उत्सवाला भाविक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येत असतात. म्हणुन या उत्सवाला नवसाची आखाडी असे म्हणतात.

या उत्सवाची सुरूवात देवी-देवतांना आमंत्रण देऊन पवित्र बल्ली पूजन करून बरोबार एक महिन्याने उत्सव सुरू होतो. तत्पूर्वी सर्व सोंगाचा लिलाव पद्धतीने सोंग लोक घेत असतात व मोठ्या उत्साहात देवाचे सोंगा सजवतात त्यासाठी कितीही खर्च लागला तरी तो करायची तयारी भक्तांची असते. बल्ली पूजन होताच उत्सव समितीच्या दिवंगत पंचांचे स्मरण करून लिलाव पूकारायला सुरूवात होते, हा सोंगांचा लिलाव पाहण्यासारखा असतो आपल्याला आवडीच्या दैवताचे सोंग घेण्यासाठी भक्तांची येवेळी चढाओढ पाहण्यास मिळते सोंगा लिलावात कितीही महाग गेले तरी भक्त आनंदानाने समाधानाने आवडीचे सोंग घेतात….

यावेळची आखाडी १२ वर्षांनी होत असल्याने सोंगाचा पुकारा करणाचे जुने भालदार-चोपदार दिवंगत झाल्याने नविन भालदार-चोपदार यांची नेमणूक उत्सव समितीने केली आहे. श्री विजय देशमुख व श्री नंदू शिंदे हे आता नविन भालदार-चोपदार आहेत. भालदार- चोपदार सोंगांचा पुकिरा अनोख्या पद्धतीने करतात…. तो असा ,

आरेगाव का पारेगावा , पारेगाव का ढे-या ,

मखमली मांडव मोत्याचा तुरा ,

बडीजोर मेहेबान सलाम…

गजानन गणपती की सवारी

आती है निगाह रखो महाराज….

हा आखाडी ( बोहाडा ) उत्सव पाच ( ०५ ) दिवसांचा असतो. पहिल्या दिवशी फक्त गजानन गणपती व शारदा हेच सोंग असते… त्यामुळे सुरूवातीला पूर्वीच्या काळी लोकनाट्य तमाशा असायचा परंतू आता थोडा बदल करून सांस्कृतिक कार्यक्रमाने व भक्तीगीतांच्या मैफीलीने आखाडी उत्सवास सुरूवात होते. यावेळी चांदवड चे भुमिपूत्र गायक संगीतकार श्री योगेश खंदारे यांच्या सुमधूर संगीतिक मैफीलीने सुरूवात झाली.

हा लोकोत्सव म्हणजे एकतेचा समानतेचा व जात धर्म विसरून एकोप्याने केला जातो… मुस्लीम धर्मिय देखील उत्सव समितीत सहभागी होतात…. मुळात या उत्सवाचे मुख्य आकर्षण आसलेले देवी-म्हसोबाचे सोंगातील…. म्हसोबाचे भक्त गनीभाई बागवान यांची आज्ञा झाल्याशिवाय म्हसोबाचे सोंग पूढे जात नाही… गनीभाई बागवान यांच्या घराण्याची व्यक्ती च्या हातून म्हसोबास टिळा दिल्यानंतर व खेलो महाराज असे त्यांनी म्हटल्यानंतर म्हसोबा देवतेचा आपोआपच सोंगात संचार होतो व ते सोंग पंन्नास पंन्नासा लोकांनाही आवरत नाही… मंडपाच्या पूढच्या बाजूने देवी चे सोंग निघते व मंडपात देवी म्हसोबाची भेट होताच देवी म्हसोबास कट्यारीचा स्पर्श करताच म्हसोबाची आलेली हवा शांत होते… अजून देवीच्या सोंगात दैवी शक्तीचा संचार असतोच …. मग भाविकभक्त देवीला केलेला नवास भेडतात व तत्पूर्वी उत्सव समिती देवी ला पूढील उत्सव कधी घ्यावा याबाबत कैल घेतात…. अशा पद्धतीने उत्सवाची सांगता होते.

या अनोख्या उत्सवात असंख्य देवी दैवतांची सोंगे काढली जातात ती सोंगे अशी….. १) गजानन गणपती / शारदा २) विरभद्र ३ ) भीम बकासूर ४ ) कच्छ-मत्स्य ५ ) बाळंतीनबाई ६ ) महादेव पार्वती ७ ) एकादशी ८ ) कुंभकर्ण ९ ) इंद्रजीत १० ) रावण ११ ) वेताळ महाराज १२ ) नरसिंह महाराज १३ ) खंडेराव १४ ) देवी-म्हसोबा. इ. सोंगे आखाडी उत्सवात नाचविली जातात या सोंगांपैकी फक्त देवी- म्हसोबा या दैवी सोंगाचा लिलाव होत नाही….. देवी चे सोंग श्री दीपक आहेर यांचेकडे व म्हसोबाचे दैवी सोंग श्री संजय आहेर यांचेकडे वंशपरंपरेने आले आहे…. पाच दिवसांचा हा उत्सव म्हणजे अनोखे मंतारलेले क्षण भक्त मनात साठवून ठेवतात…

या वर्षी दि. १५ मे १९ मे पर्यंत हा उत्सवा रंगणार आहे… यासाठी उत्सव समितीने जय्यत तयारीला सुरूवात केलीये… येणाऱ्या भाविक-भक्तांची उदंड गर्दी लक्षात घेता समितीने यावेळी दोन मोठे एलईडी वॉल लावण्यात आल्या आहेत…

एव्हढा मोठा उत्सव भरविण्यासाठी उत्सव समिती मोठ्या कुशलतेने सर्व लोकांना सहभागी करून घेतात…. उत्सव यशस्वीतेसाठी पूढील उत्सव समितीतील सदस्य परिश्रम घेतात…

उत्सव समिती विश्वस्त १) श्री अशोक काका व्यवहारे २) ॲडा श्री नरेंद्र कासलीवाल ३) श्री भुषण कासलीवाल ४) श्री विजय सांबर ५) श्री दिपक व्यवहारे ६ ) श्री रामचंद्र बर्वे ७ )श्री सुरेश बिल्लाडे ८ ) श्री राजेंद्र बिरार ९ ) श्री मधुकर शेवाळे

पंच कमिटी १ ) श्री पुनम बिल्लाडे २ ) श्री सुरेश जाधव ३ ) संतोष सोनवणे ४ ) श्री प्रशांत बर्वे ५ ) साहेबराव शिंदे

उत्सव समिती सदस्य
१) ॲड विशाल व्यवहारे २) सचिन ( गुड्डु ) खैरनार ३) संजय क्षत्रिय ४) किशोर क्षत्रिय ५) किरण वाघ ६) निलेश देशमुख ७) संदिप शेवाळे ८) महेंद्र कर्डिले ९) बापू राऊत १०) मुकेश जाधव ११) शैलेश जाधव १२) फिरोज बागवान १३) रिजवान बागवान १४) प्रशांत वैद्य १५) संतोष भालेराव १६) पप्पूशेठ भालेराव १७) अंकुर कासलीवाल १८) प्रशांत दळवी १९) संजय सोनवणे २०) महेश बो-हाडे २१)योगेश ( पिंटू ) बर्वे २२) महेश नेवगे २३) नरेंद्र शेजवळ २४) महेश खंदारे २५) गणेश ( पिंटू ) जगताप २६) राहुल जाधव २७) नितिन शिंदे २८) गणेश खैरनार २९) मयुर बिरारी ३०) गणेश वाघ ३१) अमोल बिल्लाडे ३२) बंटी पिंगटे ३३) विकास जाधव ३४) यशोदिप घमंडी ३५) गोटू सोनवणे ३६) पप्पू सोनवणे ३७) भरत सोनवणे ३८) मोहन कर्डीले ३९) रूपेश पवार ४०) चेतन ढोमसे ४१) बाजीराव चव्हाण ४२) अरूण बिरारी ४३) डॉ जीवन देशमुख ४४)ॲड संदिप व्यवहारे ४५) विशाल बर्वे ४६) सागर बर्वे ४७) हितेश महाले ४८) संदिप दाभाडे ४९) योगेश परदेशी ५०) सुशिल पंडीत ५१) भरत क्षत्रिय ५२) दर्शन नामपूरकर ५३) पंकज नामपूरकर ५४) विशाल जाधव.

देवी उत्सवाचे पौरोहित्य
श्री अरूण दीक्षित गुरूजी , श्री अमोल दीक्षित गुरूजी व समस्त दीक्षित परिवार.

संबळ वाजंत्री
उसवाडकर बंधू आणि सहकारी…..

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या