[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

काळखोडे तालुका चांदवड येथील कोरोना काळात पितृछत्र हरपलेल्या शेतकरी कुटुंबातील तिन्ही दिव्यांग भावंडांना मायेचा हात देत तिनचाकी सायकल भेट मिळताच मुलांचे झाले आश्रु अनावर

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

काळखोडे तालुका चांदवड येथील कोरोना काळात पितृछत्र हरपलेल्या शेतकरी कुटुंबातील तिन्ही दिव्यांग भावंडांना मायेचा हात देत तिनचाकी सायकल भेट मिळताच मुलांचे झाले आश्रु अनावर

 

काळखोडे येथील अत्यंत गरीब प्रामाणिक शेतकरी म्हणून आपली ओळख असलेले, शेतकरी स्व.जिभाऊ शेळके, यांचे कोरोणा काळात निधन झाले या निधनानंतर आपली पत्नी व तीन अपत्य यांच्यावर जणूकाही दुःखाचा डोंगरच कोसळला आणि उपासमारीची वेळ दिसू लागली. यात महत्त्वाचे म्हणजे तीन मुलं ते तिन्ही पण अपंग आई वृद्ध व मनाने खचलेली आपली कशीबशी शेती करत आपल्या लेकरांना सांभाळत आहे. यात यांना ही तीन अपत्य असून त्यापैकी एक मुलगा गोरख शेळके मुलगी राणी व ज्योती शेळके असे आहे यांचे शिक्षण 10 वी पूर्ण करून सध्या घरीच आहे.  लहानपणात वडील असताना शाळेत कोणी पण सोडून देत असे किंवा वडिलांची ही रोजची ड्युटीच झाली होती. वडील गेल्यानंतर शाळा कशी शिकायची आपल्याला कोण शाळेत सोडेल असे संकट लक्षात येताच आता आपल्याला देवाच्या रूपात मदत कोण करेल या प्रश्नात असताना या विद्यार्थ्यांनी प्रहार संघटनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर यांच्याशी संपर्क केला व आपली हकीकत सांगितली त्यावर निंबाळकर यांनी तात्काळ चांदवड प्रशासन प्रमुख अधिकार्यांमधला देव माणूस सर्वसामान्यांच्या नेहमी मदतीस धावणारे माननीय चांदवड तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या बरोबर चर्चा करून यांनी आपला मार्ग शोधण्यास सुरुवात केली. तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ प्रशासकीय सेवेतील आपले कर्तव्य बजावत असताना सरकारी योजना कोणकोणत्या आहे याची तंतोतंत माहिती देऊन व मदत करून यांना अपंगत्वाचे पगार चालू करून दिले तसेच पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्या माध्यमातून या पित्याचे छत्र हरवलेल्या मुलांना घराचे ही छत्र नव्हते. हेच उद्दिष्ट समोर दिसत असताना या कुटुंबावर सहकार्य करत यांनी तात्काळ आपले घरकुल मंजूर करून यांना पहिला हप्ता देखील वर्ग केला आहे. आणि यात या मुलांना सौचालय,रूम,किचन हे आपल्याला हाताळण्यास सोईस्कर होईल असे बनविण्याचे नियोजन केलेले आहे. कुठल्याही प्रकारची हालचाल करता येत नाही म्हणून त्यांना तहसीलदार प्रदीप पाटील व गणेश निंबाळकर यांच्या सहकार्यातून यांनी चांदवड नगरपरिषदेचे प्रथम माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांना ही माहिती दिली व या माहितीतून त्यांनी आपला मित्र परिवार व उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख,तहसीलदार प्रदीप पाटील,जैन अटो-मोबाईल चे संचालक नंदुभाऊ पारख, माजी नगरसेवक रवींद्र अहिरे, अरिहंत ट्रॅक्टर चे संचालक प्रतीक बाफना या सर्वांच्या सहकार्यातून या मुलांकरिता दोन साय कलींचे नियोजन करून दिले यामुळे या मुलांना आता घराच्या बाहेर पडणे शक्‍य होणार आहे तसेच यांना बाहेरचे जग बघण्यास थोडी का होईना चालना मिळेल असे लक्षात आले. विशेष म्हणजे सर्व अधिकाऱ्यांचा ताफा घेऊन प्रहार उपजिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर व प्रशासन प्रमुख माननीय तहसीलदार साहेब भूषण जी कासलीवाल व सर्व टीम या मुलांना घरपोच मळ्यात जाऊन सायकली देण्यात आल्या त्या वेळी या मुलांच्या डोळ्यातून अश्रू अनावरण झाले यावेळी तहसीलदार प्रदीप पाटील,भूषण कासलीवाल,प्रतीक बाफना,राज्यमंत्री नामदार बच्चु कडू यांचे सिव्यसहाय्यक गौरव दादा जाधव, प्रकाश चव्हाण, चंद्रभान गांगुर्डे, दत्तू शेळके,शरद शेळके, नितीन फंगाळ, बाळासाहेब डूकरे, शिवाजी शेळके, बाळासाहेब शेळके,अनिल शेळके,नाना शेळके,अण्णा शेळके, अशोक बैरागी,नरहरी शेळके,वाल्मिक शेळके,भाऊसाहेब शेळके, व गावातील सरपंच उपसरपंच सदस्य पोलीस पाटील आदी नागरीक उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या