8 अ उतारा म्हणजे काय / ग्रामपंचायत नमुना 8 उतारा – संपूर्ण माहिती
तुम्ही जर कोणत्याही ग्रामपंचायत हद्दीत राहत असाल तर तुम्ही 8 अ चा उतारा, सात बारा, फेरफार यांसारखे उतारे पहिलेच असतील. परंतु ही कागदपत्रे काढायची कशी, त्याचे फायदे काय आहेत तसेच त्यांचा वर लिहलेल्या गोष्टींचा अर्थ काय व यातील फरक काय हे सगळ्यांच माहीत असते असे नाहीये. अशा सर्वांसाठी या लेखामध्ये आम्ही घेऊन आलो आहोत 8 अ उतार्या बाबतची सर्व माहिती. 
सातबारा उतार्यावरून जमिनीचा मालक त्या जमीनीवरील कर्ज तसेच त्या जमिनी मध्ये कोण कोणती पिके घेतली जातात या बाबतची माहिती मिळते. परंतु अनेकांना 8 अ उतार्या बाबत माहिती नसते. चला तर मग जाणून घेऊयात 8 अ उतारा म्हणजे काय ? तो कसा मिळेल, त्याचे फायदे काय काय आहेत, त्यावरील माहिती कशी वाचायची आणि समजून घ्यायची आणि सातबारा उतारा व 8 अ उतारा यातील फरक काय आहे.
8 अ उतारा म्हणजे काय?
▪️8 अ उतारा म्हणजे ज्या गावातील तो उतारा आहे त्या गावामध्ये एखाद्या व्यक्तीच्या मालकीची किती एकूण किती जमीन आहे याची माहिती देणारा उतारा. एखाद्या व्यक्तीची गावामध्ये एका पेक्षा जास्त ठिकाणी जमीन असेल तर त्याची सर्व माहिती तुम्हाला एका कागदावर म्हणजेच 8 अ च्या उतार्यावर मिळू शकते.आणि याच 8 अ उतार्याच्या आधारे ग्रामपंचायत कर आकारणी करते.
ग्रामपंचायत नमुना 8 चा उतारा कुठे मिळेल?
▪️8 अ च उतारा मिळवायचे २ मार्ग आहेत,एक म्हणजे जमिनीचा ग्रामपंचायत नमुना 8 चा उतारा तुम्ही तलाठी कार्यालयातून / घराचा ग्रामपंचायत नमुना 8 चा उतारा ग्रामपंचायत मधून घेऊ शकता किंवा दूसरा मार्ग म्हणजे तो तुम्ही ऑनलाइन डाऊनलोड देखील करू शकता. तलाठी कार्यालयातून किंवा ग्रामपंचायत मधून नमुना 8 चा उतारा घेण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष तिथे जाऊन तो घ्यावा लागेल. ऑनलाइन पद्धतीने हा उतारा मिळवण्यासाठी खाली दिलेल्या क्रमाने तुम्ही डाऊनलोड करू शकता.
https://bhulekh.mahabhumi.gov.in
या वेबसाईटल भेट द्या.

या वेबसाइट वर आल्यावर समोर दिसत असलेल्या स्क्रीन वर तुमचा विभाग निवडा.
त्यानंतर 8 अ वर क्लिक करा.
खाली तुमचा जिल्हा,तालुका आणि गाव निवडा.
तुम्हाला तुमचा गट नंबर माहीत असल्यास खाते नंबर वर क्लिक करून समोर येणार्या बॉक्स मध्ये तुमचा गत नंबर टाका.
त्यानंतर सर्च बटन वर क्लिक करा.
वरील प्रमाणे कृती केल्यावर तुम्हाला तुमचा ग्रामपंचायत नमुना 8 चा उतारा बघायला मिळेल जो तुम्ही फक्त माहिती साठी वापरू शकता,इतर शासकीय कामकाजा साठी तुम्हाला 8 अ चा उतारा ऑनलाइन डाऊनलोड करायचा असल्यास
https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr
या लिंक वरून तुम्ही तुमची माहिती भरून लॉगिन करा आणि ऑनलाइन पेमेंट करून तुमच्या क्षेत्राचा सातबारा उतारा व 8 अ च उतारा डाऊनलोड करू शकता.

