[masterslider id="2"]
राज्य विशेष लेख संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

‘मी बहुरूपी’ अशोक सराफ यांच्या पुस्तकाचे प्रकाशन ना. छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

अशोक सराफ यांचा आज ७५ वा वाढदिवस आणि अभिनय कारकिर्दीला देखील ५० वर्ष पुर्ण झाली. तब्बल ५० वर्ष अशोक सराफ यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. आज त्यांच्या कारकिर्दीवर आधारीत “मी बहुरुपी” या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.

अशोक सराफ हे मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीचे सम्राट अशोक आहेत. आजही अशोक सराफ यांचे सिनेमे टीव्हीवर लागले की खळखळुन हसायला लावतात. त्यांचे अनेक चित्रपट तर मराठी विनोदी चित्रपटांच्या इतिहासातले माइलस्टोन आहेत. अशा या हरहुन्नरी अभिनेत्यास त्यांच्या पुढील कारकीर्दीस भुजबळ यांनी शुभेच्छा दिल्या आणि पुढील कारकिर्दीस सदिच्छा दिल्या.

यावेळी मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार, दिग्दर्शक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या