[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

म्हसुर्ली आदिवासी सोसायटीवर वाजेच्यां गटाचे निर्विवाद वर्चस्व : सर्व जागा झाल्या बिनविरोध

 

ईगतपुरी -(नवनाथ गायकर)-

ईगतपुरी तालुक्यातील म्हसुर्ली आदिवासी विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीवर माजी चेअरमन तथा सहकार नेते स्व.रावजी पा. वाजे यांच्या आशिर्वादाने व युवा नेते गुलाब वाजे व माजी चेअरमन संपत वाजे यांच्या नेतृत्वाखाली पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच शांततेत व बिनविरोध पार पडली आहे. या सोसायटी वर वाजे गटाने पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

एकुण १३ संचालकाच्या जागासाठी ही निवडणूक होती. यातील सर्वच जागा बिनविरोध निवड करण्यात आलेल्या आहेत.

बिनविरोध निवड झालेले संचालक मंडळ पुढीलप्रमाणे- अनुसूचित जमाती महिला राखीव गटातुन श्रीमती सोमीबाई गिर्हे, अनुसूचित जाती गटातुन संजय डोळस, बिगर आदिवासी कर्जदार गटातुन गुलाब वाजे, बाळु तांबे, आदिवासी कर्जदार गटातुन धोंडु पारधी, बाळु बांगारे, महादु मुकणे, मंगा शिद, भिमाबाई शिद, गंगाराम शेंडे, दामु शेंडे, भटक्या जाती जमाती गटातुन शंकर भारस्कर व इतर मागास गटातुन संपत वाजे आदी.

बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय आधिकारी दिपक बर्वे यांनी केली आहे.
नवनिर्वाचित संचालक मंडळाचे म्हसुर्ली चे सरपंच जगन पोटकुले, आहुर्लीचे उपसरपंच गणेश खकाळे, गुलाब वाजे, संपत वाजे, सचिव वामन डोळस आदिनीं अभिनंदन केले आहे.

लेखकाबद्दल

पत्रकार नवनाथ गायकर - इगतपुरी

एक टिप्पणी द्या