वेध निवडणुकांचे : दरेगाव ग्रामपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर
मुदत संपत आलेल्या दरेगाव ग्रामपंचायतीच्या येणाऱ्या निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण विशेष ग्रामसभेत तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी एच.के. मगर यांनी जाहीर केले आहे. दरेगाव येथील लोकसंख्या 2011 च्या जनगणनेच्या नुसार 2727 आहे. त्या आधारे तीन प्रभाग असुन तीनही वार्डात प्रत्येकी तीन सदस्य असणार आहेत.
एक जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव असुन सदर जागा महिला राखीव राहणार आहे. एक जागा अनुसूचित जाती यासाठी राखीव असणार आहेत. तर उर्वरित सात जागा सर्वसाधारण आहे. त्यापैकी चार जागा महिलांसाठी राखीव जागा आहे. यावेळी ओ.बी.सी.राखीव ऐवजी त्या जागा सर्वसाधारण राहणार आहेत.
प्रभाग 1 ची लोकसंख्या 949 ,प्रभाग दोनची लोकसंख्या इतकी 895 तर प्रभाग तीनची लोकसंख्या 883 इतकी आहे.
चांदवड तालुक्यातील 36 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक कालावधीची मुदत लवकरच संपणार असल्याने सदर ग्रामपंचायतीची प्रभाग रचना करण्यात आली आहे. त्यानंतर प्रभागातील आरक्षण सोडत काढण्यात आले आहे. दरेगाव येथील ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमातीची स्त्री करिता राखीव करण्यात आले आहे. 2021 ची जणगणना न झाल्यामुळे यावेळी सदस्य संख्या वाढली नसून 2011 च्या जणगणनेच्या आधारे पुर्वीचीच सदस्य संख्या राहणार आहे. सदर आरक्षण सोडत मंडळ अधिकारी एच. के. मगर यांनी जाहीर केली. याप्रसंगी सरपंच अमोल देवरे,,तलाठी मिलिंद गुरूबा.ग्रामसेवक एस.आर.डांगरे,
बबनराव गांगुर्डे, भाऊसाहेब देवरे,सोमनाथ देवरे, राकेश गांगुर्डे,रतन गांगुर्डे, भावराव गांगुर्डे, भिला पगार, महेंद्र गांगुर्डे,उत्तम खरात,रामदास पिंपळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
________________________
दरेगाव ग्रामपंचायत आरक्षण असे
*प्रभाग एक : – सर्वसाधारण, अनुसूचित जमाती स्त्री , सर्वसाधारण स्त्री .

