वडनेर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी आरती सातभाई हिला वकृत्व स्पर्धेमध्ये घवघवीत यश
के के वाघ शिक्षण संस्थेची कर्मवीर काकासाहेब वाघ वाणिज्य विज्ञान व कॉम्प्युटर सायन्स महाविद्यालय रामाचेपिंपळस भाऊसाहेब नगर येथे आकाशवाणी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वकृत्व स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय वडनेर भैरव तालुका चांदवड जिल्हा नाशिक या महाविद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी आरती अशोक सातभाई तसेच कुमारी स्वाती वसंत पाचोरकर व कुमारी शितल बाबाजी पगार या तीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यात कुमारी आरती अशोक सातभाई या विद्यार्थिनीला तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले त्याबद्दल तिचे संस्थेच्या सरचिटणीस आदरणीय नीलिमाताई पवार त्याचप्रमाणे मविप्र संस्थेचे संचालक माजी आमदार उत्तम बाबा भालेराव त्याचप्रमाणे महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष इंजिनीयर दिलीप रावजी धारराव व महाविद्यालय विकास समिती सदस्य यांनी तिचे अभिनंदन केले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस के पगार सर महाविद्यालयाचे उपप्राचार्य अमोल भगत सर मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक विठ्ठल जाधव सर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कार्यालयीन सेवक यांनी तिचे अभिनंदन केले

