नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी संवाद अभियाना सारखा उपक्रम स्तुत्य….! – रंजन ठाकरे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त जेलरोड प्रभाग क्र.23 मध्ये परिसर संवाद अभियान राबिण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष रंजन ठाकरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले तसेच कार्यकर्त्याने नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायला हवा आणि गरज पडली तर आंदोलन उभे करावे असे मत मांडले.
प्रभाग 23 मध्ये योगेश निसाळ यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात आले यावेळी जेष्ठ नेते निवृत्ती महाराज अरिंगळे,नाशिकरोड अध्यक्ष मनोहर मामा कोरडे,संजय दाजी खैरनार,मा. नगरसेविका सुषमाताई पगारे ,संजय बोडके,बाळासाहेब जाधव,योगेश निसाळ, राहुल तुपे, गौतम पगारे,हेमंत कांबळे, राजाभाऊ पवार, सुरेखाताई निमसे, विद्याताई पाटील, कुंदाताई शहाणे, रुपाली ताई पठारे, संजय पगारे,नियामत भाई शेख,निलेश जगताप,वजाहत शेख, प्रवीण बोराडे, राकेश कांबळे,शंकर औशिकर,मंगेश लांडगे,हर्षदा बर्वे, वनिताताई कोरडे, बाबासाहेब अस्वले,चंदूभाऊ साडे, किरण राक्षे, प्रज्योत सुरवाडकर, प्रथमेश पवार, मोहन निसाळ, अनिल घोलप, अतुलचव्हाण, ओम काळे, आशुतोष चव्हाण, आकाश म्हस्के, आकाश गवारी, प्रसाद वागले, मानस जगताप, भूषण बागुल, तेजस सुरवाडकर, मयूर दोबाडे, रोहित जाधव, तुषार ताजनपुरे, संकेत बुचडे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 

