कळमदरे येथे शहिद जवान अर्जुन गांगुर्डे यांचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
चांदवड(प्रतिनिधी ): –
चांदवड तालुक्यातील मोजै कळमदरे येथील अर्जुन तुकाराम गांगुर्डे यांना आज शनिवार दिनांक (११) रोजी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला. त्यांच्या वीर मरणाने गावावर शोककळा पसरली असून यांना गुरुवार दिनांक (९)रोजी ५.३० वा. वीरगती प्राप्त झाली होती. सदर भारतीय सेना दलाचे अर्जुन गांगुर्डे हे चांदवड तालुक्यातील असून त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, मुलगी,दोन भाऊ, मुलगा असा परिवार असून त्यांचा मुलगा देखील भारतीय सेवा दलातील शासकीय कर्तव्य बजावत आहे.
तालुक्यातील कळमदरे येथील रहिवासी व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात कार्यरत असलेले जवान अर्जुन तुकाराम गांगुर्डे वय (५१) यांचे ओडिशात सेवा बजावत असताना हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कुटुंबीयांना कळताच धक्काच बसला त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या पत्नी पुष्पा बाई, मुलगा रोहन, आई वत्सलाबाई, वडील तुकाराम गांगुर्डे,भाऊ रावसाहेब व समाधान गांगुर्डे असा मोठा परिवार आहे त्यांचा मोठा मुलगा रोहन हा एन.डी.ए. मध्ये लेफ्टनंट पदावर सिक्कीम येथे कर्तव्यावर आहे. तर भाऊ समाधान रेल्वे सुरक्षा बल मुंबई येथे कार्यरत आहे. अर्जुन गांगुर्डे हे १३ ऑक्टोंबर १९९१ मध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात दाखल झाले होते.देशसेवेत कर्तव्यावर असलेल्या आपल्या या भूमीपूत्राच्या जाण्याची बातमी कळमदरे ग्रामस्थांना समजतात संपूर्ण गावांमध्ये शोककळा पसरली असून, आपले दैनंदिन व्यवहार बंद करीत त्यांच्या घराकडे धाव घेत आई-वडिलांचे सांत्वन केले त्यांचे पार्थिवावर आज चार वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला.यावेळी तहसीलदार प्रदीप पाटील पोलिस निरीक्षक समीर बारवकर, कृषी अधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य पोलिस पाटील, ग्रामसेवक, आदी शासकीय अधिकारी,पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

