दिंडोरी प्रतिनिधी : बी के कावळे कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल 100% लागला असून गुणवत्ता यादीत मुलींनीच आघाडी घेतली आहे अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य बीके शेवाळे व कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख श्री बाळासाहेब वडजे यांनी दिली आहे कादवा कारखाना कार्यस्थळावर ईल कर्मवीर राजाराम सखाराम वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्था संचलित बी के कावळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजाराम नगर येथे इयत्ता बारावीच्या वर्गात चा निकाल शंभर टक्के लागला असून दिंडोरी तालुक्यात आदर्शवत निकालाची परंपरा याहीवर्षी विद्यालय ने कायम राखलेली आहे प्राचार्य बीके शेवाळे यांनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावी निकालाची माहिती देताना म्हटले आहे की कला विभागात 109 विद्यार्थी परीक्षार्थी झाले होते या विभागातील सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले कला विभागात प्रथम भगरे सुनिता अशोक द्वितीय घोडे रोहिणी विजय तृतीय भूमी शितल अशोक विज्ञान विभागात 157 परीक्षार्थी होते ते सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाले या विभागात प्रथम कुमारी काळूगे कृष्णाली पुंडलिक व उगले श्रुती बालकृष्ण द्वितीय सुरवाडे स्नेहल राजेंद्र तृतीय मातेरे कोमल शिवाजी याही विभागाचा निकाल शंभर टक्के लागला वाणिज्य विभागात त्रेसष्ट विद्यार्थी परीक्षार्थी होते ते पण सर्व च्या सर्व उत्तीर्ण झाले यात प्रथम कावळे तेजस्विनी योगेश द्वितीय उगले कोमल अजित तृतीय उगले कोमल नवनाथ याबरोबरच किमान कौशल्य या विभागात अठरा विद्यार्थी प्रविष्ट झाले होते ते पण सर्व च्या सर्व उत्तीर्ण झाले या प्रथम जाधव गणेश बाबाजी द्वितीय सरोदे प्रमिल राजेंद्र तृतीय मोरे शुभम गणेश यशस्वी व गुणवत्ताधारक विद्यार्थी व प्राध्यापक यांचे कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, व्हाईस चेअरमन शिवाजी दादा बस्ते, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शहाजी दादा सोमवंशी उपाध्यक्ष सुभाष राव शिंदे सचिव बाळासाहेब उगले व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले आहे

