[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

शेतकरी कन्या मयुरी गायकर चे सुयश

शेतकरी कन्या मयुरी गायकर चे सुयश

ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- (नवनाथ गायकर)-
—————-
-: शेतीमध्ये राबता राबता व कुठलेही अवांतर क्लासेस न लावता कठोर मेहनतीच्या बळावर शिक्षण घेणाऱ्या आहुर्ली या छोट्याशा खेडयातील शेतकरी कुटुंबातील कन्या मयुरी नागेश गायकर हिने माध्यमिक शालांत परिक्षेत ८९.६० गुण मिळवत दैदिप्यमान सुयश मिळवले आहे. ती आहुर्ली येथील न्यु इंग्लिश स्कुल माध्यमिक विद्यालयाची विदयार्थीनी आहे.

सलग दोन वर्षाचा कोरोनाचा भयावह कालखंड यामुळे शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होऊनही घरच्या शेतात राबत व जिद्दीने अभ्यास करत मयुरी ने हे सुयश मिळवले आहे. विशेष म्हंणजे यासाठी कुठलीही अवांतर शिकवणी न लावता तिने हे यश मिळवले आहे.

आपल्या या यशाचे श्रेय तिने आपल्याला अभ्यासाला प्रौत्साहन देणार्या आई वडिल यांच्या सह मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकानां दिले आहे. शिवाय यांच्या सह कठोर परिश्रम केल्यानेच हे शक्य झाल्याचेही तिने बोलताना म्हटले आहे.
तिच्या या यशाचे वडिल नागेश गायकर यांच्या सह आहुर्लीचे माजी चेअरमन नवनाथ गायकर आदिसह शिक्षक व घरातील नातेवाईक यांनी कौतुक केले आहे.

लेखकाबद्दल

पत्रकार नवनाथ गायकर - इगतपुरी

एक टिप्पणी द्या