[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

 विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

प्रधानमंत्री पिक विमा योजनेला खरीप व रब्बी हंगाम २०२२-२३ या वर्षाकरिता मान्यता देण्यात आलेली असून त्यासाठी एचडीएफसी एर्गो इन्शुरन्स लि.ही कंपनी नियुक्त करण्यात आलेली आहे.खरीप हंगामात खरीप ज्वारी, बाजरी, मका, भुईमुग, सोयाबीन, मुग, उडीद, तुर व खरीप कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण प्राप्त झाले आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०२२ पर्यंत मुदत असून तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिकविमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे यांनी केले आहे.

कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक करण्यात आली असून कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधीत बँकेस किंवा पतपुरवठा करणाऱ्या संस्थेस कळविणे बंधनकारक आहे. या योजनेतंर्गत पिक पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गीक आग, विज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, भु-सख्खलन, पावसातील खंड, किड व रोग इत्यादीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट जोखमीच्या बाबीमध्ये समाविष्ट केलेली आहे.तालुक्यातील सर्व प्रमुख अन्नधान्य,गळीत धान्य आणि नगदी पिकांचा समावेश या योजनेत करण्यात आलेला आहे.पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी बांधवांना ७२तासांच्या आत पिक विमा ॲप, कंपनी प्रतिनिधी किंवा टोल फ्री क्रमांकावर कळवावे लागणार आहे.प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ७/१२उतारा,खाते उतारा,आधारकार्ड, बँक पासबुक, पिक परेणी स्वयं घोषणापत्र या कागदपत्रांची छायांकीत प्रत सादर करणे आवश्यक असणार आहे.

खरीप हंगाम २०२२-२३ करिता पीक निहाय भरावयाचा विमा हप्ता व संरक्षीत रक्कम प्रति हेक्टरी पुढीलप्रमाणे आहे.
*बाजरी-* विमा संरक्षीत रक्कम ३००००/-शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता रक्कम रू.६००/-
*मका-* विमा संरक्षीत रक्कम रु.३५५९८/- व शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता रु.७११.९६/-
*तुर-* विमा संरक्षीत रक्कम रु.३६८०२/-व शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता रु. ७३६.०४/-
*मुग-* विमा संरक्षीत रक्कम रु.२००००/-व शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता रु ४००/-
*उडीद-* विमा संरक्षीत रक्कम रु.२००००/- व शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता रु.४००/-,
*भुईमुग-* विमा संरक्षीत रक्कम रू.४२९७१/- व शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता रु ८५९.४२/-
*सोयाबीन-* विमा संरक्षीत रक्कम रु.४९५००/- व शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता रु.९९०/-
*खरीप कांदा-* विमा संरक्षीत रक्कम रु.८१४२२/- व शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु.४०७१.१०/-असा आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पेरणी केलेल्या पिकांस विमा संरक्षण मिळणेसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी व्हावे व पिक विमा भरण्यासाठी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र अथवा राष्टीयकृत बँकेशी संपर्क साधावा असे आवाहनही तालुका कृषि अधिकारी विलास सोनवणे यांनी केले आहे.

विमा काढलेल्या पिकाचे नुकसान झाल्यास शेतकरी बांधवांनी पिक विमा ॲप वर स्वतः नोंदणी करावी किंवा विमा कंपनी प्रतिनिधी अथवा १८००२६६०७०० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

-विलास सोनवणे,तालुका कृषी अधिकारी,चांदवड

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या