आषाढी एकादशी निमित्त वडनेरभैरव येथे पालखी रथाचे आयोजन
वडनेर भैरव येथील ग्राम संत जिवनेश्वर काळुबाबा आश्रमाच्या वतीने वडनेर भैरव गावातील मुख्य रस्त्यांवरून आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने वडनेर भैरव भजनी मंडळाच्या सहकार्याने पालखी रथाचे आयोजन करण्यात आले होते वडनेर भैरव दत्त मंदिर या ठिकाणी या पालखीचे स्वागत व पूजन सलादे बाबा कला क्रीडा मंडळाच्या वतीने श्री भाऊसाहेब देवराम भालेराव श्री पोपटराव पाचोरकर श्री दत्ता शिंदे सुरेश निकम श्री माणिकराव तिडके श्री शेखर वक्ते यांच्या उपस्थितीत सौ निकिता मनीष सलादे व सुशीला सुरेश सलादे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संत जिवनेश्वर आश्रमाचे पदाधिकारी व भाविक भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

