[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

संत ज्ञानेश्वर विद्यालयात 76 वा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

महात्मा फुले सांस्कृतिक कला क्रीडा व शिक्षण संस्था संचलित संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 76 वा स्वातंत्र्य दिन व भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

आज दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी विद्यालयात 75 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी सन्माननीय श्री विनोद शेठ संकलेचा (मालेगाव) श्री सरजीत चौधरी (मालेगाव )श्री विवेक बच्छाव (मालेगाव ) हे उपस्थित होते कार्यक्रमाचे ध्वजारोहण माननीय श्री सुरेश शेठ सुभाष झालते (मालेगाव मुंगसे कांदा व्यापारी मालेगाव ) यांचे हस्ते करण्यात आले त्यानंतर महात्मा फुले सांस्कृतिक कला क्रीडा व शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री एन एस मंडलिक यांचे तर्फे श्री सुरेश शेठ झालते साहेब यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेचे संचालक माननीय श्री चिंधु नाना खैरे यांचे तर्फे श्री विनोद शेठ संकलेचा मालेगाव यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर श्री सरजित चौधरी मालेगाव यांचा सत्कार माननीय श्री केशवजी खैरे सरपंच वाहेगाव साळ यांच्यातर्फे करण्यात आला. त्यानंतर श्री विवेक बच्छाव यांचा सत्कार वाहेगाव साळ चे पोलीस पाटील श्री दीपक खैरे यांचे तर्फे करण्यात आला. श्री विजय सोमनाथ मंडलिक यांचा सत्कार संचालक मा. श्री एन एम पवार यांचे हस्ते करण्यात आला. विद्यालयाचा माजी विद्यार्थी डॉक्टर प्रदिप मच्छिंद्र खैरे यांचा सत्कार संचालक श्री बाबुराव शिंदे यांचे हस्ते करण्यात आला.
त्यानंतर इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रथम 3 क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी दिले जाणारे बक्षीस श्रद्धा सबुरी पेट्रोलियम वाहेगाव साळ चे संचालक माननीय श्री अनिल तानाजी खैरे यांचे तर्फे बक्षीस देण्यात आले . तसेच माननीय श्री शिवाजी खंडेराव शिंदे MSEB कॉन्ट्रॅक्टर यांचे तर्फे एस.एस.सी. परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले तसेच कै. कचेश्वर रावजी न्याहारकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री शरद कचेश्वर न्याहारकर यांचे तर्फे एस.एस.सी. परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. कै. डॉक्टर कृष्णा मंडलिक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री भारत वाल्मीक मंडलिक यांचे तर्फे एस.एस.सी परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. त्यानंतर विद्यालयाची विद्यार्थिनी प्राप्ती देवढे या विद्यार्थिनीने स्वातंत्र्य बद्दल भाषण केले. त्यानंतर कार्यक्रमाचे ध्वजारोहक मा. श्री सुरेश शेठ झालते साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देवडे के. डी. यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. सूत्रसंचालन श्री जाधव एस.एम यांनी केले.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या