नुकत्याच पार पडलेल्या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. या निवडणुकीत नितीन ठाकरे यांचा परिवर्तन पॅनल तर नीलिमाताई पवार यांचा प्रगती पॅनल यांची दोन पॅनल समोरासमोर उभे ठाकले होते
आज या निकालाची सगळ्यांनाच उत्सुकता असताना, काही कार्यकर्त्यांनी आपल्याच पॅनलचा विजय होणार अशा पोस्ट टाकल्या आहेत. मात्र अद्याप कोणताही निकाल सूत्रांच्या हाती आलेला नाही. व्हाट्सअपवर येणाऱ्या अफवा अथवा व्हायरल पोस्ट यांची खात्री करूनच पोस्ट शेअर कराव्यात अशा सूचना निवडणूक वरिष्ठांकडून मिळाले आहे

