चांदवड शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रथमच दीक्षांत समारोह संपन्न
चांदवड – चांदवड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शैक्षणिक वर्ष 2020-21 व 2021-22 या प्रवेश सत्रतील प्रथम द्वितीय व तृतीय उत्तीर्ण गुणवंत विद्याथ्र्यांना गुणपत्नक व सर्टिफकेट देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे गटनिदेशक ए.के.वाघ हे होते तर प्रमुख पाहुणो म्हणून चांदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या समन्वय समितीचे अध्यक्ष व नाशिकचे उद्योजक कैलास वराडे ,श्री नेमिनाथ जैन तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विशाल वानखेडे हे उपस्थित होते. यावेळी संस्थेतील प्रथम द्वितीय व तृतीय वर्गात उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्यार्ंना पदवी प्रदान करण्यात आली.सूत्नसंचालन डी. एल. दंडगव्हाळ यांनी केले तर प्रास्ताविक एम.बी.आरकस यांनी केले
कैलास वराडे यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मिळवलेल्या प्राविण्याची नेहमीच चीज होत असते तसेच आपणास विविध कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध असते तर रोजगाराबरोबरच स्वयंरोजगाराची संधी प्रत्येक विद्याथ्र्याला मिळते तिचा लाभ प्रत्येकांने घ्यावा असे त्यांनी सांगितले.
आभार एन.के. सोनवणो यांनी मानले यावेळी संस्थेतील गुणवंत प्रशिक्षणाथ्यार्ंच्या पालकांचा व निदेशकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सर्व निदेशक पालक व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

