चांदवड तालुक्यात पूर्व भागात अतिमुसळधार पाऊस. नद्यांना पूर तर पिकें जमीनदोस्त.
चांदवड तालुक्यातील पूर्व भागातील विविध गावांमध्ये आज रविवारी पावसाने अत्यंत कहर केला असून नद्या नाले धरणे तुडुंब भरून वाहत आहेत . ढगफुटीसदृश्य पावसाने ठीक ठिकाणी नद्या नाल्यांना पूर आले असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे विशेष म्हणजे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भाजीपाला पिके तर संपल्यात जमा आहे.
चांदवड तालुक्यातील पूर्व भागातील गावांमध्ये तसेच नांदगाव तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये सतत संततधार पाऊस सुरू असून . रविवारी दुपारी साडेच्यार पासूनसुरू झालेला सततचा पाऊस रात्री उशिरा पर्यंत सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात पिकांची हानी झाली आहे.
https://youtube.com/shorts/7F3Ne_Fu-eA?feature=share
नद्यांना पूर आल्याने काही ठिकाणी अनेक गावांच्या संपर्कही तुटला आहे विजेची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे पावसाने वीज गायब झाल्याने अनेक अडचणींना लोकांना तोंड द्यावे लागत आहे .या पावसामुळे कांदा रोपे नष्ट झाली असून बाजरीचे पीक तर होत्याचे नव्हते झाले आहे अनेक ठिकाणी मक्याच्या व सोयाबीनच्या पिकामध्ये पाणी साचले असून मोठे नुकसान झाले आहे. टोमॅटो ,मेथी व अन्य भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पाणीच पाणी सर्वत्र अशी परिस्थिती असून या वर्षातील हा सर्वात मोठा पाऊस म्हणून गणला जात आहे सातत्याने पाऊस पडत असताना तो उघडण्याचे नाव घेत नाही.
पाऊस सुरूच असल्याने पाऊस कधी उघडेल या प्रतीक्षेत शेतकरी आहे संततधार पावसामुळे पशुधनाच्या खाद्याचा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.असून पिकांचे अतोनात नुकसान पंचनामे न करता सरसकट सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे असे गृहीत धरून शासनाने तत्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केले आहे.
https://youtube.com/shorts/7F3Ne_Fu-eA?feature=share
चांदवड तालुक्यातील दरेगाव निमोण, कानडगाव, कुंदलगाव, दहेगाव, रायपूर, गंगावे ,विटावे ,निंबाळे ,शिंगवे डोणगाव, दहेगाव ,वागदर्डी, मेसनखेडे, कोकणखेडे ,उसवाड भडाने विटावे आदी गावांमध्ये पावसाने कहर केला आहे. रात्री उशिरा पर्यंत पाऊस सुरूच होता.

