[masterslider id="2"]
क्रीडा जाहिरात मुख्य बातमी राष्ट्रीय लेख विशेष लेख संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवडी रुपय्या जिल्हास्तरीय काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

परीक्षक म्हणून डॉ. तुषार चांदवडकर आणि कवी संदीप गुजराथी यांनी काम पाहिले.

चांदवडी रुपय्या जिल्हास्तरीय काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर

चांदवडी रुपय्या साहित्य कलारसिक मंडळ चांदवड आयोजित जिल्हास्तरीय काव्यलेखन स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. त्यासाठी जाहीर आवाहन केल्याप्रमाणे अनेक कवींकडून रचना प्राप्त झाल्या होत्या. यात खुला गट व बालगट असे दोन विभाग करण्यात आले होते. यामध्ये आवाहन केल्याप्रमाणे जिल्ह्यातील कवींनी उत्फुर्त प्रतिसाद दिला.

खुल्या गटात प्रथम क्रमांक तुकाराम सिताराम ढिकले (आडगाव नाका, नाशिक) द्वितीय क्रमांक प्रमोद शंकर चिंचोले (उपेंद्र नगर, नाशिक) तृतीय क्रमांक प्रतिभा सुरेश खैरनार (नांदगाव, नाशिक) उत्तेजनार्थ ज्ञानोबा त्रंबक ढगे (बळी मंदिर कॉलनी, नाशिक), संगिता मधुकर महाजन  (येवला) व अजय बिरारी (त्र्यंबक रोड, नाशिक) असे असून, बालगटात प्रथम क्रमांक प्रांजल योगेश गांगुर्डे (सुतारखेडे, ता चांदवड) द्वितीय क्रमांक पूजा बापू जाधव (सुतारखेडे, ता. चांदवड) तृतीय क्रमांक तेजस्विनी सचिन आहेर (सोग्रस, ता. चांदवड) उत्तेजनार्थ दीक्षा बाबाजी गांगुर्डे (सोग्रस ता चांदवड) आणि वैष्णवी दिलीप माळी (मालसाने, ता चांदवड). “

प्रथम क्रमांक तुकाराम सिताराम ढिकले (आडगाव नाका, नाशिक)

 

द्वितीय क्रमांक प्रमोद शंकर चिंचोले (उपेंद्र नगर, नाशिक)

तृतीय क्रमांक प्रतिभा सुरेश खैरनार (नांदगाव, नाशिक)

उत्तेजनार्थ ज्ञानोबा त्रंबक ढगे (बळी मंदिर कॉलनी, नाशिक)

उत्तेजनार्थ संगिता मधुकर महाजन (येवला)

उत्तेजनार्थ अजय बिरारी (त्र्यंबक रोड, नाशिक)

या दोन्ही गटांच्या परीक्षणासाठी परीक्षक म्हणून डॉ. तुषार चांदवडकर आणि कवी संदीप गुजराथी यांनी काम पाहिले.

या स्पर्धेतील गुणवंत कवींना चांदवडी रुपय्या मंडळाच्या वार्षिक गुणगौरव समारंभात पारितोषिके देऊन गौरवण्यात येईल. अशी माहिती मंडळाचे सचिव सागर जाधव जोपुळकर आणि अध्यक्ष रावसाहेब जाधव यांनी दिली. याप्रसंगी  जनार्दन देवरे, संजय गोराडे, रवींद्र देवरे, बाळा पाडवी, वाल्मीक सोनवणे, सविता दरेकर, मेधा मलोसे, राहुल केदारे, नवनाथ गायकर, हर्षल गांगुर्डे, अजित जाधव, शांताराम हांडगे, सविता दिवटे, भागवत मांदळे, बाळकृष्ण जाधव, देव हिरे, केशव वाकचौरे, शिवराज पाटील आदींनी विजेत्या सर्वांचे जाहीर अभिनंदन केले.

 

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या