[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

कर्होळे ग्रामपंचायतीच्या पाच जागा बिनविरोध थेट सरपंच पदासह एका जागेवर निवडणूक

कर्होळे ग्रामपंचायतीच्या पाच जागा बिनविरोध
थेट सरपंच पदासह एका जागेवर निवडणूक

ईगतपुरी – (नवनाथ गायकर)-

ईगतपुरी तालुक्यातील बहुचर्चित ग्रामपंचायत असणाऱ्या कर्होळे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सात पैकी पाच जागा बिनविरोध झालेल्या आहेत. पैकी थेट सरपंच पदासाठी सरळ लढत असुन उर्वरित एका ग्रामपंचायत सदस्य पदाच्या जागासाठीही सरळ लढत होणार आहे.
थेट सरपंच पद हे अनुसूचित जमाती साठी राखीव आहे. या पदासाठी अशोक आघाण व रविंद्र मडके यांच्यात सरळ लढत होणार आहे.
बिनविरोध निवड झालेल्या पाच जागावरील सदस्याचीं नावे पुढील प्रमाणे- वाँर्ड क्रं.१- अनुसूचित जमाती राखीव जागेवर अंकुश आवजी आघाण, वाँर्ड क्रं. १- सर्वसाधारण स्री राखीव जागेवर- सौ.आशा पांडुरंग खातळे,
वाँर्ड क्रं. २- अनुसूचित जमाती स्री राखीव जागेवर- सौ.मंदाबाई निव्रुत्ती लाव्हरे,
वाँर्ड क्रं ३- अनुसूचित जमाती राखीव जागेवर पंढरीनाथ किसन खेताडे, तर वाँर्ड क्रं ३- अनुसूचित जमाती स्री राखीव जागेवर सौ.लताबाई अशोक आघाण यांची बिनविरोध निवड झाली आहे.
दरम्यान थेट सरपंच पदासह एका जागेवर दुरंगी व सरळ लढत होत असुन यासाठी दिग्गजाचीं प्रतिष्ठा पणाला लागली आहे

लेखकाबद्दल

पत्रकार नवनाथ गायकर - इगतपुरी

एक टिप्पणी द्या