[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

शिंगवे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न 

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

शिंगवे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न 

 

श्री मतोबा महाराज विविध कार्यकारी सहकारी संस्थेची वार्षिक सर्व साधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन श्री संजय सखाराम आहिरे होते. तर सभेत सचिव श्री वालचन्द्र राजोळे यानी विविध प्रकारच्या सभासदाच्या प्रश्नाना उत्तरे दिली वार्षिंक सर्वसाधरण सभा शिंगवे ग्रामपंचायतीच्या हॉलमध्ये पार पडली प्रथम सचिव राजोळे यांनी मागिल सभेचे इतिवृत वाचून त्यावर चर्चा केली व ते कायम करण्यात आले त्यानंतर 2021-22 ह्या वर्षाचे तेरिज,ताळेबंद,नफा,तोटा पत्रक वाचून कायम करण्यात आले सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता अंदाजे बजट मंजूर करण्यात आले शासकीय हिशोब तपासणी अहवाल व दोष दुरुस्ती अहवाल वाचून कायम करण्यात आला आगामी वर्षा करिता क.म.पत्रक तयार करून बँकेकडे पाठविणे व बाहेरील कर्ज मर्यादा ठरवीण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीला देण्याचा निर्णय घेण्यात आला थकबकिदार सभासदच्या यदिचे वाचन करण्यात आले व लेखापरिक्षण नेमणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली सभासदांनी शेअर्स संदर्भात माहिती घेतली तसेच शासनाच्या नियमित कर्जदारासाठी असणारे प्रोत्साहन पर अनुदानासंदर्भात माहिती घेतली.

यावेळी सस्थेचे चेअरमन श्री संजय आहिरे व्हा चेअरमन श्री मघुकर झाल्टे माजी चेअरमन व विघमान संचालक श्री जगन्नाथ खताळ संचालक श्री संजय खताळ श्री नामदेव ठाकरे श्री नाना गुंड श्री श्रावण खताळ श्री देवमन गुंड श्री रघुनाथ खताळ श्री चिंतामण मढे सौ संध्याताई माळवतकर सौ ठकुबाई मढे लिपिक श्री अनिल कुलकर्णी आदि सस्थेच्या वतीने सहभागी झाले होते तर सदर सभेत प्रमुख उपस्थिती माजी सरपंच श्री तुकाराम तात्या खताळ माजी चेअरमन श्री भिकाजी मढे मा.उपसरपंच श्री शिवाजी झाल्टे श्री संदीप शिवमन गुंड श्री सुकदेव बोरसे श्री श्रीधर मढे श्री राजाभाऊ माळवतकर श्री कौतिक गुंड श्री कारभारी मढे श्री साहेबराव मढे एन.डी.सी.बँकेचे इन्स्पेक्टर श्री प्रदिप खताळ साहेब इत्यादि सह अनेक शेतकरी सभासद उपस्थित होते

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या