[masterslider id="2"]
राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

मनमाड मालेगाव महामार्गावरील कानडगाव फाट्याजवळ हायड्रोजन सिलेंडर वाहनाने घेतला पेट सिलेंडर रॉकर सारखे हवेत उडाले.

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

मनमाड मालेगाव महामार्गावरील कानडगाव फाट्याजवळ हायड्रोजन सिलेंडर वाहनाने घेतला पेट सिलेंडर रॉकर सारखे हवेत उडाले.

मनमाड मालेगाव महामार्गावरील चांदवड तालुक्यातील कानडगाव फाट्याजवळ आज दुपारच्या सुमारास सर्वांना हदरावणारी घटना घडली काय झाले काय नाही हे घटनास्थळापासून दूरवर असणाऱ्या लोकांना कळेना .सिलेंडर रॉकेट सारखे आकाशात उडाले सिलेंडर रॉकेट सारखे वीस ते पंचवीस फूट उडाले सिलेंडर हवेत ब्लास्ट झाले. गाडीत सुमारे 200 सिलेंडर होती त्यापैकी पंधरा ते वीस सिलेंडर फुटल्याची माहिती मिळत आहे .

सदर अपघातात चोंडी घाटा जवळील कानडगाव फाट्याजवळ झाला आहे.चालकाने वेळेस प्रसंगावधान दाखवल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. चालक किरकोळ जखमी झाल्याचे समजते. कुणीतरी बॉम्ब फेकते अशा पद्धतीने सिलेंडर हवेत उडत होते ,एकूणच सर्व घटना चित्त थरारक होती परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. सदर अपघात हा मनमाड मालेगाव रोडवरील कानडगाव फाट्याजवळ झाला. सिलिंडरचा स्फोट होऊन हवेत उडाले. सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही.

मालेगाव मनमाड माहामार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळविली आली होती मनमाड मालेगाव येथील अग्निशमन दलाने आग विझविण्यासाठी प्रयत्न केला.
सिलिंडर गाडीने अचानक पेट घेतल्याने क्षणात आगीने रुद्र रूप धारण केले यात सिलिंडर असल्याने आगीने जास्त पेट घेतला व सर्व सिलिंडर हे अक्षरशः हवेत उडत होते.मनमाड व चांदवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हा रस्ता ब्लॉक केला. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मनमाड मालेगाव माहामार्गावरील वाहतूक इतरत्र वळवण्यात आली असुन सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसली तरी गाडीचे व सिलिंडर याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या आगीचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना बसला असून कानडगाव येथील अण्णा राजनोर यांच्या शेतातील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे.

 सदर गाडी ही मालेगाव कडून मनमाड कडे येत होती .सदर गाडी दहा टायरची होती व रस्त्यात पलटी झाल्याने सिलेंडरचा स्फोट झाला.आम्ही कानडगावकरांनी वेळच खबरदारी घेत घटनास्थळापासून एक किलोमीटर दूरवर गाड्या आडव्या लावून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या थांबवल्या पुढील धोका होऊ नये म्हणून ही दक्षता घेण्यात आली . चांदवड व मनमाड पोलिसांनी येऊन दहा किमी पर्यंत ट्रॅफिक जाम झाली होती , त्यासाठी पर्यायी व्यवस्था केली. घटनास्थळी पंचनामा केला
– विजयनाना गांगुर्डे ,माजी उपसरपंच कानडगाव

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या