चांदवड बाजार समितीत नविन लाल कांदा आवकेस सुरुवात
लाल कांद्यास रु.1425/- व उन्हाळ कांद्यास रु. 2121/- उंच बाजारभाव
चांदवड बाजार समितीचे आवारावर दैनंदिन कांदा शेतीमालाचे लिलाव सुरु असुन सद्यस्थितीत नविन लाल कांद्याची आवक देखील सुरु झाली आहे. चांदवड बाजार समितीत दि.08/10/2022 रोजी नविन लाल कांदा विक्रीस आल्याने बाजार समिती व व्यापारी वर्गातर्फे कांदा विक्रेता शेतकरी श्री. बापु बाबुराव आहिरे रा. खडकी (मालेगाव) यांना शाल व श्रीफळ देवून नविन लाल कांद्याच्या खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी लाल कांद्यास प्रतीनुसार रुपये 1425/- प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. तसेच उन्हाळ कांद्यास रु. 1000 ते 2121 व सरासरी रु.1600/- प्रति क्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाले. या प्रसंगी शेतकरी, कांदा व्यापारी बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी आदि. मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतीमाल विक्रीची रक्कम रोख स्वरुपात अदा करण्यात येत असल्याने तसेच सोमवार दि.10/10/2022 पासुन चांदवड बाजार समितीत भुसार मालाचे लिलाव सुरु होणार असल्याने शेतकरी बांधवांनी आपला कांदा व भुसार शेतीमाल प्रतवारी करुन मोठ्याप्रमाणात चांदवड बाजार समितीत विक्रीस आणावा, असे आवाहन समितीच्या प्रशासक श्रीमती प्रेरणा शिवदास, सचिव श्री.गोरक्षनाथ गांगुर्डे व कांदा व्यापारी असोशिएशन यांनी केले आहे.

