तालुकाध्यक्ष संजय जाधव यांचे सहभागी होण्यासाठीचे तरुणांना आवाहन
चांदवड तालुका काँग्रेस कमिटी बैठक मा. शिरीष कोतवाल यांच्या अध्यक्षतेखाली चांदवड येथे संपन्न झाली. येत्या १८ नोव्हेंबर २०२२ रोजी शेगाव येथे चांदवड तालुक्यातून ‘भारत जोडो’ यात्रे मध्ये ५०० कार्यकर्ते सामील होणार असून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची प्रामाणिक इच्छा तयार झाली आहे.
‘भविष्यामध्ये शेतकऱ्यांचा तसेच सार्वभौम विचार करणारा एकमेव पक्ष म्हणून कॉंग्रेस पक्ष उभा असेल. खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वखाली होणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून असणार आहे. काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेस शेतकरी अडचणीस आला असेल त्या वेळेस पक्षाने शेतकऱ्याला मदत केलेली आहे, अशी माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी माहिती दिली.’

‘चांदवड तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत असून तालुक्यात मोठ्या प्रमाणत पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिंदे फडणवीस सरकार फक्त एकमेकांसमोर राजकारण करून भांडत आहे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिला आहे. कोणती आर्थिक मदत केली नाही. तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी अन्यथा चांदवड तालुका काँग्रेस पक्ष तर्फे मोर्चा काढण्यात येईल, असे आवाहन तालुकाध्यक्ष संजय जाधव यांनी केले.’
आहे. यावेळी कार्याध्यक्ष समाधान जामदार, अॅड. अनवर पठाण, अक्षय माकुने, दत्तूमामा ठाकरे, नंदू रघुनाथ कोतवाल, भाऊसाहेब शेलार, संतोष देशमाने, अशोक बाबा जाधव, निवृत्ती गुंजाळ, भारत ठाकरे, सुभाष गणपत जाधव, भगवान शिंदे , ज्ञानेश्वर शिंदे, श्रावण शिंदे, संपतराव वक्ते, निरंजन जाधव, सागर गोविंद निकम, उत्तमराव ठोंबरे, सुदर्शन पानसरे, दिपांशु अरुण जाधव, अरुण पगार, हरीश्चंद्र रकिबे, साहेबराव पुंडलिक जाधव, विलास निकम, संजय कोल्हे, विजय कुंभार्डे, बाळू गांगुर्डे, अरुण ठाकरे, सोपान जाधव, शिवाजी निवृत्ती जाधव, शंकरराव शिरसाठ, अल्ताफ तांबोळी, जावेद घाशी, अमोल गांगुर्डे, अशोक कारभारी जाधव, बापू अर्जुन शिंदे, पिंटू जाधव, भिमराव निरभवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


