[masterslider id="2"]
मुख्य बातमी संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड तालुका युवक कॉंग्रेस ची जंबो कार्यकारिणी जाहीर.

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड तालुका युवक कॉंग्रेस ची जंबो कार्यकारिणी जाहीर.

शासकीय विश्रामगृहात काँग्रेस पक्षाची ‘हाथ से हाथ जोडो‘ अभियानावर चर्चा करण्यासाठी पक्ष निरीक्षक श्री.संदीप पाटील (जळगाव) व काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री तुषार दादा शेवाळे,स्वप्नील पाटील,गौरव पानगव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व शिरीष भाऊ कोतवाल यांच्या अध्यक्षते खाली व तालुकाध्यक्ष संजय दगुजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली..
युवक काँग्रेस चे तालुकाअध्यक्ष श्री.दिपांशु जाधव यांनी चांदवड तालुका व चांदवड शहर युवक काँग्रेस ची कार्यकारिणी जाहीर केली.. पक्ष निरीक्षक श्री. संदीप पाटील यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सत्कार करत अभिनंदन केले व सर्वांना काँग्रेस पक्षवाढीसाठी व काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळात पोहोचवण्याचे आवाहन केले..तसेच जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार दादा शेवाळे यांनी युवक काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती पाहून दीपांशु जाधव यांचे कौतुक करत कार्यकारिणीला मार्गदर्शन केले.

डॉक्टर तुषार दादा शेवाळे यांनी चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिपांशु जाधव यांनी केलेल्या कामाबाबत व सर्व तरुण वर्गाला काँग्रेसकडे वळण्यासाठी केलेले प्रयत्न व जंबो अशी युवक काँग्रेसचे कार्यकारणी तयार करून काँग्रेसला चांगले दिवस आणण्यासाठी आजपासून चांदवड तालुक्यात युवकांनी सुरुवात केली आहे..तसेच चांदवड तालुका काँग्रेस पक्षाने कांद्याचे आंदोलनात पहिली उडी घेऊन कांद्याचे आंदोलनाला सुरुवात केली त्यामुळे संपूर्ण जिल्हाभर कांद्याचे आंदोलन सुरू झाले म्हणून तालुकाध्यक्ष संजय जाधव यांचे देखील कौतुक केले..

खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो आंदोलना मध्ये मोठ्या प्रमाणात युवक,तरुण वर्ग,महिला वर्ग,शेतकरी वर्ग सामील होऊन सर्व शेतकरी बांधवांची व्यथा जाणून घेतल्या व शेती बाबद अडी अडचणी जाणून घेतल्या मुळे त्यांनी राहुल गांधी यांचे पण आभार मानले..पक्षाचे निरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले की युवक काँग्रेस राजकीय सामाजिक क्षेत्रात चांगल्या प्रकारे कामाचा ठसा तयार करून सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न आणि अडचणी सोडवण्यासाठी सगळ्यांना बरोबर घेऊन नवीन युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी गाव तिथे शाखा सुरू करून पक्षाला नाही ज्या ठिकाणी माझी गरज पडेल त्या ठिकाणी आपणास मदत करण्यासाठी केव्हाही आमंत्रित करा मी पोहोचेल असे आश्वासन संदिप पाटील यांनी दिले..

तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री शिरीष कोतवाल यांनी सांगितले की,चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघांमध्ये बीजेपीचे खासदार आमदार असल्याने या ठिकाणी कोणत्या प्रकारे काम केले गेले नाही आणि शेतकऱ्यांसाठी कोणतीही अधिवेशनामध्ये कांद्याचा भाव असेल द्राक्षाचा प्रश्न असेल या ठिकाणी उपस्थित केलेला नाही मी शेतकऱ्यां तर्फे या ठिकाणी विनंती करतो की राजकारण बाजूला ठेवून आपण शेतकऱ्यांसाठी आपल्या सरकारकडे आपल्या नेत्यांकडे शेतीमालाच्या भावासाठी प्रयत्न करावे अशी विनंती केली..

तसेच नवीन युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना चांगल्या प्रकारे काम करण्याची संधी आहे किंवा काँग्रेसमार्फत युवक काँग्रेस मधूनच कार्यकर्ते नेता आमदार खासदार तयार होत असतो तालुकाध्यक्ष श्री.संजय जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात पक्ष निरीक्षक व जिल्हाध्यक्ष यांच्याकडे कांदा व इतर शेतीमालाचे पडलेल्या बाजार भावासंदर्भात लक्ष वेधून घेत काँग्रेस पक्षाला जिल्हाभर मोठे आंदोलन उभारण्याची विनंती केली..
यावेळी श्री. भिमराव निरभवने यांनी सूत्रसंचालन केले व युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष दिपांशू जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.. प्रसंगी शिवाजी कासव,संपत वक्ते,अन्वर पठाण, बाळासाहेब शिंदे, विलास निकम,अरुण रकिबे,निरंजन जाधव,सागर निकम,कैलास कोतवाल,उत्तम देशमाने,अमोल जाधव,स्वप्नील जाधव कैलास सावकार, पप्पु कोतवाल, धोंडिराम पिंपरकर, दत्तु कोतवाल,दिपक वाघ, परशराम केदारे व ईतर मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते उपस्थित होते..

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या