प्रहार संघटनेने पुकारलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्राणांतिक उपोषणा संदर्भातील काही मागण्या मान्य झाल्याने अखेर उपोषणाची सांगता
चांदवड :-.
दिनांक २ मार्च २०२३ रोजी प्रहार संघटनेने पुकारलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्राणांतिक उपोषणा संदर्भातील काही मागण्या मान्य झाल्याने अखेर उपोषणाची सांगता करण्यात आली .
उपोषणाचा दुसऱ्या दिवशी उपोषण सुरू असताना चर्चेसाठी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव,व प्रशासक, तसेच देवळा बाजार समितीचे सचिव, प्रशासक, चांदवड पोलीस स्टेशनचे एपीआय समीर बारवकर साहेब, तसेच चांदवड प्रांत कार्यालयाचे नायब तहसीलदार जे एस केदारे,तसेच तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार श्री. बी.व्ही.खेडकर, यांच्याशी चर्चा केली असता उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार मांडलेल्या मागण्या एकूण सहा मागण्यांपैकी चांदवड प्रांत कार्यालय व जमलेल्या वरील जमलेल्या अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीमुळे तीन मागण्या यशस्वीरित्या पार पडल्या त्या पुढील प्रमाणे लेखी स्वरूपात घेण्यात आले आहेत..

दिनांक २२/ ०२/२०२३ रोजी च्या पत्रांवर कांदा बाजार भाव घसरल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत आला दोनशे रुपये ते पाचशे रुपये भावाने कांदा विकला जातोय आणि कांद्याला खर्च पंधराशे रुपये प्रतिक्विंटलच्या पुढे आहे विचार करा ७०% दर खर्चाने कुठला व्यवहार जगाच्या पाठीवर केला जातो अशा विषयाचे निवेदन दिल्या गेलेले होते त्यापैकी उपरोक्त विषयाला सरकार गांभीर्याने घेत नाही राज्य सरकारने केंद्र सरकारने संयुक्तिक धोरण निश्चित करावे या प्रश्नांना गांभीर्याने घ्यावे शेतकऱ्याला न्याय मिळवण्यासाठी प्रांंतिक उपोषणाला सुरुवात करत आहोत असे दिनांक ०२ मार्च २०२३ पासून गुरुवार रोजी प्राणांतिक उपोषण आणि मुक्काम मोर्चा यासारख्या आंदोलनाने आम्ही सरकारला जागे करू असे नमूद असलेले पत्र दाखल केलेले होते व त्यानुसार उपोषण करते हे उपोषणात बसलेले होते याबाबत उपोषण करते यांनी बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना अवांतर खर्च किती नियमबाह्य खर्चावर लगेचच आळा घालावा तसेच कांदा वांदा हे प्रकरण कायमचेच मिटवून तसा कायदा व्हावा लिलावानंतर कांदा वाहतूक एक किलोमीटर पेक्षा जास्त नसावी इत्यादी व इतर मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास प्रांत कार्यालयाला घेरावा घालण्यात येईल असा इशारा दिलेला आहे त्या अनुषंगाने तहसील कार्यालय चांदवड येथे दिनांक २/३/ २०२३ रोजी दुपारी तीन वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती त्यानुसार उपोषण करते यांच्या भेटीदरम्यान खालील प्रमाणे अधिकारी उपस्थित होते यामध्ये श्री अनिल पाटील प्रशासक मार्केट कमिटी चांदवड, श्री.सुजय पोटे प्रशासक मार्केट कमिटी देवळा, श्री समीर बारवकर पोलीस निरीक्षक चांदवड, श्री नितीन पाटील सहकार अधिकारी श्रेणी.२ चांदवड, श्री.जी.एन.गांगुर्डे सचिव मार्केट कमिटी चांदवड, श्री.नितीन जाधव सचिव मार्केट कमिटी उमराणे तालुका देवळा, श्री.माणिक निकम सचिव मार्केट कमिटी देवळा, श्री.विलास सोनवणे तालुका कृषी अधिकारी चांदवड, श्री.जे.एस.केदारे नायब तहसीलदार उपविभागीय अधिकारी चांदवड, श्री.बी.व्ही.खेडकर नायब तहसीलदार तहसील कार्यालय चांदवड, या सर्वांच्या बैठकीत निर्णय झाल्याप्रमाणे बैठकीत पुढीलप्रमाणे लेखी स्वरूपात…
उपोषणकर्ते यांच्याशी चर्चेदरम्यान उपोषण करते यांच्या मागणी अर्जातील मुद्द्यांबाबत चर्चा करण्यात आली असता खालील प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत निश्चित करण्यात आलेले आहे
मागणी क्रमांक ०१
बाजार समिती आवारात शेतकऱ्यांकडून आकारला जाणारा गेट पास शुल्क फी तात्काळ बंद करण्यात येईल त्याबाबत सचिव व प्रशासक मार्केट कमिटी चांदवड तसेच सचिव व प्रशासक मार्केट कमिटी देवळा व सचिव मार्केट कमिटी उमराणे तालुका देवळा यांनी दिनांक ०२/०३/२०२३ रोजी लेखी पत्र उपोषणकरते यांना देण्यात आले आहे तसेच कायमस्वरूपी गेटपास हा कुठेच घेतल्या जाणार नाही असे लेखी स्वरूपात उपोषणकर्त्यांना देण्यात आले.
मागणी क्रमांक ०२
तोलाई हिशोब पट्टीवर पण असते व व्यापाऱ्याच्या खळ्यावर गेल असता शेतकऱ्यांना तेथे पण रोख स्वरूपात काट्याचे पैसे द्यावे लागतात त्या संदर्भात आता यापुढे तसे पैसे शेतकऱ्याने द्यावे लागणार नाही, तसेच इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर वजन मापाची सोय बाजार समितीनेच करून देण्यात यावी ह्याबाबत सचिव प्रशासक मार्केट कमिटी चांदवड, व तसेच सचिव प्रशासक मार्केट कमिटी देवळा, सचिव मार्केट कमिटी उमराणे तालुका देवळा, यांनी दिनांक ०२/०३/२०२३ रोजीच्या पत्रान्वये सदर बाबत शासन निर्णय परिपत्रकानुसार कार्यवाही करण्यात येईल असे नमूद असलेले लेखी पत्र उपोषण करते यांना देण्यात आलेले आहे
मागणी क्रमांक. ३
शेतकऱ्याच्या कांद्याचा मार्केट आवारात लिलाव झाल्यानंतर व्यापाऱ्याच्या खळ्यावर गेला असता कांद्याचा वांदा काढला जातो या वाद्याबाबत वांदा समितीवर शेतकरी प्रतिनिधीची नियुक्ती करणे बाबत वार्षिक सभेतील प्रतिनिधींच्या मागणीप्रमाणे वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव सादर करण्यात येईल अशी सचिव व प्रशासक मार्केट कमिटी चांदवड, तसेच सचिव व प्रशासक मार्केट कमिटी देवळा, सचिव मार्केट कमिटी उमराणे तालुका देवळा, यांनी दिनांक ०२/०३/२०२३ रोजीच्या पत्रांवर कारवाई कार्यवाही करण्यात येईल असे नमूद असलेले लेखी पत्र उपोषण करते यांना लेखी स्वरुपात देण्यात आले आहे वरील लेखी स्वरूपाच्या पत्राचे एक एक प्रत सर्वच प्रशासकीय कार्यालयास सादर करण्यात आलेली आहे.
प्रसंगी वरील मागण्या मान्य झाल्या परंतु उर्वरित मागण्याही पूर्ण होतील जसे की कांदा अनुदान असेल हा पण थोड्याच दिवसात शेतकऱ्यांना लाभ मिळेल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले व उपोषणकर्त्यांची तब्बेत खालवल्याने डॉक्टरांनी सांगितल्याने चांदवड प्रांत साहेब चांद्रशेखर देशमुख व चांदवड तहसीलदार प्रदीप पाटील साहेब यांनी लिंबू पाणी देत उपोषणाची सांगता करण्यात आली..

