[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

निमोणला पिण्याच्या पाण्याचे ट्रॅंकर सुरू करण्याची मागणी

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड – निमोण ला तात्काळ पिण्याच्या पाण्याचे ट्रॅंकर सुरू करण्याची मागणी निमोण येथील ग्रामस्थांनी तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या कडे केली आहे. निमोण व परीसरातील विहिरींनी तळ गाठला आहे.गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठल्याने गावाला पाणीपुरवठा बंद आहे. विहिरी कोरड्या ठाक झाल्या असून पाण्यावाचून ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रत्येक कुटुंब आपापल्या परीने मिळेल तिथून शेतातून पाणी आणून आपली तहान भागवीत आहेत.आदिवासी वस्तीवरील नागरीकांचे तर प्रचंड हाल होत आहेत. शेतकरी तरी शेतातून पाणी आणून तहान भागवीत आहेत मात्र आदिवासी बांधवांना पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागते आहे. पाच हजार लिटर च्या ट्रॅंकरसाठी पाचशे रुपये मोजून पाणी घ्यावे लागते आहे.चार पाच कुटुंबामिळून एक ट्रॅंकर हे बांधव घेत आहेत. नागरीकांचे हे हाल पाहून माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पंकज दखणे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी तहसीलदार प्रदीप पाटील यांची भेट घेऊन निमोण ला तात्काळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची आग्रही मागणी केली. तसे निवेदन तहसीलदार पाटील यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, निमोण गाव दलित वस्ती व आदिवासी वस्तीवर दुष्काळामुळे पिण्याचे पाण्याचे हाल होत आहे. अश्यातच दुष्काळामुळे विहीरींनी तळ गाठला आहे. ग्रामपंचायत प्रशासन याबाबत कुठलीही कार्यवाही करतांना दिसत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाणी देखील आम्हाला मिळानासे झाले आहे. आम्हाला पिण्याचे पाणी देखील विकत घ्यावे लागत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे मोलमजूरी करणा-यांकडे कामे उपलब्ध नाहीत. अश्या अनेक अडचणींना आम्हाला सामोरे जावे लागत आहे.
तरी आपण याकामी आम्हाला निमोण या गांवी पिण्याच्या पाण्याची टँकरची सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. निवेदनावर ग्रामपंचायत सदस्या सुरेखा आहेर, अनिता अहिरे, सुरेखा पिंपळे, माजी सदस्य अशोक बाराहाते, कुंदन देवरे, दत्तु पिंपळे आदींच्या सह्या आहेत.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या