शेतक-यांसाठी जाहीर केलेले कांदा अनुदान तात्काळ मिळावे : संजय जाधव, सभापती कृउबास चांदवड
राज्य शासन व केंद्र शासन हे केवळ शेतक-यांच्या परिस्थितीचे हासु करत असुन केवळ योजना, अनुदाने जाहीर करुन शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करीत आहे. शासनाने वेळोवेळी शेतक-यांसाठी नुकसान भरपाई व विविध योजना जाहीर केल्या परंतु त्या प्रत्यक्षात आल्याच नाही, त्या केवळ शासनाच्या जाहीरातीपुरतेच मर्यादीत राहीलेले आहे. त्यामुळे शासनास जाग आणन्यासाठी आम्ही खालील मागण्यांचे निवेदन सादर करीत आहोत. तरी याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा व्हावा
१) दि.01/02/2023 ते 31/03/2023 या कालावधीत बाजार समितीत विक्री झालेल्या कांद्यास प्रति क्विंटल रु. 350/- प्रमाणे आणि जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी या प्रमाणात शासनाने कांदा अनुदान जाहीर केलेले आहे. शेतक-यांनी कांदा अनुदान मिळेल या अपेक्षेने धावपळ करुन, तसेच वित्त व वेळ खर्च करुन तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक या समितीच्या संयुक्त सहीचे अहवाल बाजार समितीकडे जमा केलेले आहेत. परंतु प्रमाणित 7/12 उतारे प्राप्त झालेले नाही. तसेच पिक पाहणीची नोंद करण्याकरीता ठराविक कालावधी निश्चित असुन त्या वर्षाची एकदा पिक पाहणी नोंद झाल्यानंतर पुन्हा नोंद होत नाही. त्यामुळे कांदा पिकाचे उत्पादन घेतलेले असतांनाही त्यांच्या 7/12 उता-यावर उत्पादित कांदा पिकाची नोंद झालेली नसल्याने मोठ्याप्रमाणात शेतकरी बांधव कांदा अनुदानापासुन वंचित राहतील. चांदवड बाजार समितीसह सर्व बाजार समित्यांमधील प्राप्त अनुदान प्रस्तावांपैकी ज्या शेतक-याचे 7/12 उता-यावर कांदा पीक पे-याची नोंद नाही, परंतु संबंधित गावचे तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहाय्यक यांचा तपासणी अहवाल /पंचनामा सादर केलेला आहे, अशा शेतक-यांना कांदा अनुदानासाठी पात्र धरण्यात यावे. तसेच कांदा अनुदानासाठी जाचक असलेल्या अटी शिथील करण्यात याव्या. त्याचप्रमाणे सद्यस्थितीत खरीप हंगाम सुरु झाल्याने शेतकरी बांधवांना बी-बियाणे, रासायनिक खते इ. शेतीउपयोगी साहित्य खरेदीसाठी आर्थिक अडचणी भासत आहेत. त्यामुळे कांदा अनुदान तात्काळ शेतक-यांच्या खात्यावर वर्ग व्हावे.२) चांदवड तालुक्यात सन २०२२ मध्ये मोठ्याप्रमाणात अवकाळी पावसामुळे शेतक-यांचे नुकसान झालेले होते. त्याचे नुकसान भरपाई शासनाने जाहीर केली. परंतु अद्याप पर्यंत नुकसान भरपाई शेतक-यांना दिलेली नाही. ती तात्काळ देण्यात यावी.
३) अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२२ मध्ये चांदवड तालुक्यातील वडाळीभोई व वडनेरभैरव गटाचा समावेश करावा.
४) दि.01/04/2023 ते आजपर्यंत विक्री झालेल्या कांद्यास अनुदान तात्काळ देण्यात यावे.
वरीलप्रमाणे वास्तव परिस्थितीचा विचार करुन शासनाने मागणी पुर्ण न झाल्यास चांदवड तालुका कॉंग्रेस कमिटीमार्फत पुढील मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल. त्यातुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. याची नोंद घ्यावी.
यावेळी समाधान जामदार, भिमराव जेजुरे, राहुल कोतवाल, शिवाजी कासव, ॲड. अन्वर पठाण,संपतराव वक्ते,दिपांशु जाधव, पंकज दखणे, उत्तमराव ठोंबरे,सागर निकम, नंदु रघुनाथ कोतवाल, ज्ञानेश्वर जाधव, राजेंद्र गिडगे, दत्ता मामा ठाकरे,भारत ढगे,भिमराव निरभवणे, अमित जाधव,पप्पु कोतवाल,जयवंत जाधव, कैलास कोतवाल आदींसह चांदवड तालुका कॉंग्रेस कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते


