राहुल येवला यांची नाशिक जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनमधे निवड
चांदवड:- येथील एसएनजेबी अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालयाचे योगा एक्सपर्ट तसेच योग विद्या धाम चांदवडचे योग केंद्रप्रमुख, योग प्रशिक्षक व योगासन स्पर्धा स्टेट जज राहुल (अंबादास) भिला येवला यांची महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन अंतर्गत नाशिक जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या कार्यकारिणीत सदस्य व संघटन सहसचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
असोसिएशनचे सचिव प्रा. पिराजी नरवाडे यांनी राहुल येवला यांची नियुक्ती केली असून त्यांच्यावर कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा व चांदवड या विभागांच्या योगासन स्पर्धा प्रमुख पदाची जबाबदारी असणार आहे. या नियुक्ती बद्दल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप चिंचोलीकर, उपाध्यक्ष दीपक उपासनी, सचिव प्रा. पिराजी नरवाडे, कोषाध्यक्ष मंदार भागवत, तांत्रिक सचिव सुनील ढमाले व इतर पदाधिकारी व सदस्यांनी अभिनंदन केले.
राहुल येवला हे महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे सदस्य व उपाध्यक्ष तथा राज्य क्रीडा समिती व स्पर्धा प्रमुख असून इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन नाशिक जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
राहुल येवला यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, टेक्निकल डायरेक्टर सतीश मोहगावकर, सचिव राजेश पवार तसेच एसएनजेबी संस्थेच्या विश्वस्त व प्रबंध समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव, सर्व सदस्य आणि अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

