[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

वडनेरकरांचे आणि निसर्ग कवी ना धो महानोर यांचे जाळी मूळीचे ऋणानुबंध.

यांनी लिहिलेले सुरेश सलादे वडनेरभैरव

वडनेरकरांचे आणि निसर्ग कवी ना धो महानोर यांचे जाळी मूळीचे ऋणानुबंध.

वडनेर भैरव परिसरातील सर्व शेतकरी हा आपल्या शेती कामात सुरुवात करीत असताना सकाळी सकाळी नऊ वाजता दूरचित्र वृत्तवाहिन्यांनी रानकवी पद्मश्री नामदेव धोंडो महानोर यांचे पुण्यात निधन. ही बातमी ब्रेकिंग न्यूज या मताळ्याखाली चालवली आणि वडनेर भैरवकरांच्या अनेक आठवणी या बातमीने ताज्या केल्या. कवी ना धो महानोर हे फक्त वडनेरकरांसाठी कवीच नव्हते तर त्यांनी चार ते पाच भेटीतच वडनेर भैरवकरांना आपलंसं केलं होतं मातीची सेवा करताना शब्द वेली वरती जे धुमारे फुटतात ते सर्व शब्द सहज त्यांच्या मुखातून कित्येकदा वडनेर करांनी मैफिलीच्या रूपाने ऐकलेले आहेत.


नेमकी कवी महानोर यांचा वडनेर भैरवशी संबंध आला तरी कसा असा प्रश्न अनेकांना पडणं साहजिकच आहे.
त्याचे असे झाले . 1993 मध्ये जैन ड्रीप या ठिबक सिंचन कंपनीने शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या इजराइल या देशाचा दौरा करण्याचे निश्चित केले आणि त्यांचे चांदवड तालुका प्रतिनिधी पाटील कृषी मंदिर चे गौतम बापू पाटील यांचं ड्रिपचे दुकान वडनेर भैरव असल्याकारणाने वडनेर भैरव येथील व परिसरातील अनेक शेतकऱ्यांना या दौऱ्याचा कळत नकळत लाभ मिळाला चांदवड तालुका हा तसा दुष्काळी तालुका म्हणून शासन दरबारी जरी नोंद असली तरीसुद्धा पश्चिम पट्ट्यातील काही गाव ही ग्रीन झोन मध्ये आहे. आणि सहाजिकच गौतम बापू पाटील व जैन ग्रुपच्या वतीने इस्राईलच्या दौऱ्यासाठी वडनेर भैरवीतील कृषी भूषण कैलासवासी शंकर बाजीराव भालेराव एस बी अण्णा प्रगतशील शेतकरी निवृत्ती दामोदर माळी एनडी दादा द्राक्ष उत्पादक श्री दत्तात्रेय मोहिते अप्पा याबरोबरच शिवरे येथील शरद अण्णा माळी,खेड गाव येथील श्री सुरेश भाऊ डोखळे, श्री राजू शेठ सोनवणे, जवळके येथील कृषी मित्र साहेबराव पाटील ही या दौऱ्यात सहभागी झाली होती.


इजराइल चा पंधरा दिवसाचा शेती दौरा हा कवी महानोर यांच्यासह आयोजित केला असल्याने या सर्वांना महानोरांबरोबर पंधरा दिवस घालवण्याची संधी मिळाली आणि साहजिकच त्यांचे साता समुद्रपालियाड ऋणानुबंध रक्ताचे नसतील परंतु भावनिक तयार झाले.
वडनेर भैरव येथे कवी महानोर हे सर्वप्रथम 2000 मध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रगतशील शेतकरी श्री एन डी दादा माळी यांच्या शेतावर त्यांनी भेट दिली यावेळी त्यांच्या शेतात सीताफळीचे एक रोपटे लावण्यात आले यावेळी भाऊसाहेब देवराम भालेराव कवी लक्ष्मण महाडिक सूत्रसंचालक श्री के के अहिरे सर माजी मुख्याध्यापक टी एल कोल्हे सर गोपेगाव चे सरपंच वसंतराव कावळे, पिंपळद चे बबन ठोंबरे, नेत्रावती पाणी वापर संस्थेचे चेअरमन श्री बाळासाहेब माळी द्राक्ष उत्पादक संदीप राहणे शिवरे येथील शरद राव माळी यासह अनेक जण उपस्थित होते.
सिताफळाच्या रोपट्याला चहुबाजूनी माती लावून झारीने पाणी टाकताना निसर्ग कवी महानोर एनडी दादांना म्हणाले की तुम्ही आणि वडनेरकर आज पासून माझे सोयरे झाले. दादांनीच सांगितले की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या न्यायाने आज तुम्ही माझ्या असते सीताफळाचे झाड लावून तुम्ही माझे सोयरे झाले त्याच वर्षी महानोर दादांनी त्यांच्या पळसखेडा सिताफळाच्या बागेतील सिताफळांना लता फळ हे नामकरण भारतरत्न स्वरसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांना भगिनींना म्हणून समर्पित केले होते म्हणजेच कवी महानोर यांचं भावनात्मक संबंध हा या सीताफळाच्या म्हणजेच लता फळाच्या निमित्ताने वडनेर करांशी जोडून आला.
त्यानंतर दादांना म्हणजेच महानोर व सौ. सुलोचना वहिनी त्यांच्या धर्मपत्नी यांना सप्तशृंगी गडावर जायचे म्हणून त्यांनी कवी लक्ष्मण महाडिक यांना सांगितले दोनएक वर्षानेच सहकुटुंब सहपरिवार महानोर कवींचा आगमन नाशिकला झाले नाशिक परिसरातील देवदर्शन केल्यानंतर त्यांनी वडनेर भैरवला भेट देण्याचे जाहीर केले आणि कृषी भूषण शंकरराव बाजीराव भालेराव म्हणजेच एसबी अण्णा शेतावर सप्तशृंगी मातेचे दर्शन घेऊन आल्यानंतर खास बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत वडनेर भैरव ची बदलती शेती, बदललेली पीक पद्धत महिलांचा शेतीत सहभाग शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना आणि शेतकऱ्यांची एकंदर स्थिती यावर सविस्तर अशी चर्चा झाली.या चर्चेत भाऊसाहेब देवराम भालेराव एनडी दादा माळी दत्तात्रय माळी विजय भालेराव, अरविंद भालेराव. आणि पिंटू भालेराव ही मंडळी सहभागी झाली. वडनेर भैरवहून जाताना त्यांनी माझ्या आग्रहास्तव श्री कालभैरवनाथ महाराज यांचे मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
जेव्हा नाशिक जिल्ह्यात कवी महानोरंजन व्हायचं तेव्हा वडनेर भैरव चे शेतकरी हे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांना भेटायला कार्यक्रमाच्या स्थळी किंवा निवासाच्या स्थळी जायचे.
कृषी भूषण शंकरराव भालेराव यांची इच्छा होती की नाशिक जिल्ह्यात पहिले कृषी साहित्य संमेलन व्हावे व त्याचे अध्यक्ष स्थान निसर्ग कवी महानोर दादांनी भूषवावे यासाठी त्यांच्या जळगावच्या कलेक्टर बंगल्याजवळच्या निवासस्थानी मी आणि शंकरराव भालेराव यांनी दोन ते तीन वेळेस भेट दिली आणि प्रत्येक भेटीत त्या कार्यक्रमाबद्दल चर्चा केली. नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात नाशिक जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी कृषी साहित्यिक यांची एक मीटिंग मीटिंग हॉलमध्ये झाली त्यात कार्यक्रमाचे प्राथमिक स्वरूपाचे नियोजन करण्यात येऊन कृषी अभ्यासक शरद पवार साहेब यांना निमंत्रित करण्याचे ठरले परंतु पुढे दादांच्याच कौटुंबिक आणि शारीरिक अडचणीमुळे पुढे या कार्यक्रमाचे नियोजन काही ना काही कारणांमुळे पुढे ढकलत गेले आणि ते परत पुन्हा कधीच झाले नाही. एसबी अण्णांची तेवढी इच्छा मात्र कायम स्वरुपी अपूर्ण राहिली.
वडनेर भैरवला स्थापन झालेल्या देशातील पहिल्या कृषी वाचनालयाच्या बाबतीत त्यांना अशी आत्मियता आणि आस्था होती.
पुन्हा वर्षांनी कवी महानोर यांचे चांदवड ला कार्यक्रमाच्या निमित्ताने आगमन झाल्यानंतर मधल्या फावल्या वेळेत त्यांनी वडनेर भैरवला भेट दिली यावेळी मात्र ते कादवा सहकारी साखर कारखान्याची व्हाईट चेअरमन कैलासवासी दत्तात्रय माळी व बाळासाहेब माळी यांच्या लाल बंगला या ठिकाणी आले. बराच वेळ हातात असल्याने त्यांनी जैत रे जैत या चित्रपटातील काही गाण्यांच्या जन्म कथा सांगितल्या त्यांनी म्हटले की मुंबई पेडर रोडवरील प्रभू कुंज लतादीदींच्या घरी आम्ही सर्वजण चित्रपटातील गाण्यांवर चर्चा करत होतो आणि त्याचवेळी देशात लोकसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या त्याचा निकाल एकेक टी वरती येत असताना इंदिरा गांधी यांचे काँग्रेसचे एक एक खासदार पराभूत होत असल्याच्या बातम्या येत असतानाच मला ओळी सुचल्या मी रात टाकली मी कात टाकली मी मोडक्या संसाराची… असे अनेक किस्से त्यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी मनमोकळ्या प्रमाणे गप्पा मारत नागवेली या पान मळ्यात त्यांनी फेरफटका मारला.
दादांचं जेव्हा जेव्हा वडनेर भैरवला आगमन व्हायचं तेव्हा तेव्हा त्यांच्यासोबत हे आपल्या हातातली कामे बाजूला सारून या साहित्य सारस्वताचे स्वागतासाठी तयार असायचे.

वडनेर भैरवला आत्तापर्यंत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, समाजसेविका सिंधुताई सपकाळ, अभिनेते निळू फुले मकरंद अनासपुरे अलकाताई कुबल माळसा फ्रेम सुरभी हांडे . अनिता दाते रमेश देव द मा मिरासदार कवी विठ्ठल वाघ यांच्यासह अनेकांनी भेटी दिल्या पण मात्र पहिल्या भेटीतच वडनेर करांना आपले सह करण्याचं काम या निसर्ग कवी आणि हाडाच्या शेतकऱ्यांनी केले. दादांना वडनेर भैरव चा शेतकरी हा कष्टाळू आणि प्रगतिशील शेतकरी म्हणून सतत जिथे शक्य असेल तिथे ते वडनेर करांबद्दल भरभरून बोलायचे
नाशिक जिल्हा शिक्षक बँक म्हणजेच एन डी एस टी च्या विद्यार्थी गौरव व शिक्षक पुरस्कार वितरण साठी नाशिक येथे आल्यानंतर दादांनी शेवटची भेट वडनेर भैरवला दिली. ती त्यांची शेवटची भेट ठरली. मध्ये त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती सुलोचना वहिनी यांचे निधन झालं तेव्हा सुद्धा अनेक शेतकरी खास दादांना भेटण्यासाठी आणि सांत्वनासाठी त्यांच्या गावी गेले होते. वडनेर करांना आपल्या मातीतला जाळी मुळी चा हा संबंध वरवर होणाऱ्या भेटींनी त्याला अजूनच बळकटी येत धुमारे फुटत राहिले आणि दादा आणि वडनेरकर यांचे संबंध शेवटपर्यंत आबादीत राहीले.
वडनेर भैरव चा शेतकरी हा दादांच्या या असीम प्रेमाने भरून गेलेला होता आपलेपणाचा ठाव यानिमित्ताने दादांनी या शेतकऱ्यांचा घेतला होता सलादे बाबा कला क्रीडा मंडळ त्यांचा शेवटचा सत्कार श्री एन डी दादा माळी यांनी वडनेर भैरवला केला यास अनेक आठवणीने घेऊन वडनेर भैरव च्या शेतकरी दादांना श्रद्धांजली अर्पण करीत आहे.
श्री सुरेश सलादे वडनेर भैरव 9921330013

लेखकाबद्दल

सुरेश सलादे वडनेरभैरव

एक टिप्पणी द्या