[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष चांदवड तालूका सहविचार बैठक सपन्न

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष चांदवड तालूका सहविचार बैठक सपन्न

चांदवड वार्ताहार दि.5/8/2023 चांदवड येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पदाधिकारी आढावा बैठक राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाअध्यक्ष श्री कोंडाजी मामा आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सर्व प्रथम सर्व पदाधिकारी व कार्येकर्ते यांचे स्वागत करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे तालूका अध्यक्ष श्री डाॅ सयाजीराव गायकवाड यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकेत त्यांनी सर्व तालूका शरद पवार यांचे सोबत असलेल्याचे प्रतिपादन केले.
त्यानंतर जिल्हाध्यक्ष मा. कोंडाजी मामा आव्हाड, मा.गजानन शेलार , पुरूषोत्तम कडलग, शामभाऊ टिळे, गोकुळ पिंगळे व इतर मान्यवरांचे सत्कार करण्यात आला
तालूक्यातून पक्षाचे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत सरपंच सोसायटी चेअरमन व कार्येकर्ते बहूसंख्येने सहविचार बैठकीस उपस्थित होते.
बैठकीत तालूक्यातील अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात आम्ही सर्व शरद पवार साहेब यांचे सोबत असून व चांदवड देवळा विधानसभचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडून आणू अशी ग्वाही दिली. तसेच शेतकर्याच्या समस्या व अडी अडचणी वर देखिल चर्चा केली. मान्यवरांनी सध्याच्या शासनावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
अध्यक्ष भाषणात निष्क्रिय शासनाचे वाभाडे आपल्या भाषणात काढले व सर्व जनतेला आवाहान केले त्यांनी मा. शरद पवार साहेबाच्यां पाठीशी जिल्हयाने ठाम पणे राहावे व पक्ष संघटना मजबूत करा.
सूत्रसंचालन दत्ता वाघचौरे यांनी केले तर अभार अमोल भालेराव यांनी मानले
कार्यक्रमास तालूक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सयाजीराव गायकवाड, विजय जाधव सूकदेव जाधव मधूकर टोपे सर,प्रकाश शेळके अनिल पाटील अरूण काका न्याहारकर,अमोल भालेराव विजय गांगूर्डे शिवाजी बस्ते रामकृष्णदादा तिडके श्याम जाधव ,नवनाथ आहेर,शैलेश ठाकरे विक्रम जगताप,सुभाष शिंदे विक्रम सलादे भारतीताई देशमुख महेश देशमाने व कार्येकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या