[masterslider id="2"]
मुख्य बातमी संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

कृउबास चांदवड ची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

कृउबास चांदवड ची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

चांदवड कृउबास समिती शेतक-यांना माती-पाणी परिक्षण प्रयोगशाळा, पेट्रोल पंप, अद्यावत शेतकरी भवन, वॉटर फिल्टर प्लॉन्ट, संगणकीकृत लिलाव पद्धत इ. सुविधा उपलब्ध करणार :- सभापती संजय जाधव

चांदवड- चांदवड कृषि उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा क्र. 16 शनिवार दि.30/09/2023 रोजी बाजार समितीचे सभापती संजय दगुजी जाधव यांचे अध्यक्षतेखाली बाजार समितीचे सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना सभापती संजय दगुजी जाधव

यावेळी मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे सभावृत्तात, आर्थिक पत्रके व सन 2022-23 चा वार्षिक अहवाल वाचुन दाखविण्यात आला. यावर सभागृहात सविस्तर चर्चा करुन मागील सभेचे सभावृतांत व उत्पन्न खर्चाची वाचुन नोंद घेण्यात आली. यानंतर मा.सभापती संजय जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच बाजार समितीस भविष्यात करावयाच्या विकास कामांची माहिती दिली. त्यात बाजार समितीचे दैनंदिन कामकाजासाठी संगणक प्रणाली खरेदी करुन शेतीमाल विक्री व्यवस्थेत पारदर्शकता आणने व बाजार समितीतील आवक, बाजारभाव, किती शेतीमालाचे लिलाव झाले, किती बाकी आहेत, याबाबतची माहिती संकेतस्थळावर देणार आहे. तसेच शेतक-यांनी बाजार समितीत किती शेतीमाल विक्री केला आहे, याबाबतची माहिती ॲपद्वारे उपलब्ध होणार आहे.

अहवाल सादर करताना सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे

मुख्य बाजार आवार,चांदवड येथे शेतकरी व बाजार घटकांसाठी 1000 लि. क्षमतेचे शुद्ध पिण्याचे पाण्याचे आर.ओ.प्लॉन्ट बसविण्यात येणार आहे, सेलहॉलचे खराब पत्रे बदलणे व पन्हाळ्या दुरुस्ती करणे, शेतकरी निवासात कॉट, गादी, ब्लॅंकेट, चटई, वातानुकुलित व्यवस्था (AC), आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था करणे, बाजार समितीतील मुख्य गेटजवळील स्वच्छतागृह अद्यावत करणे, मुख्य बाजार आवार येथील पश्चिम बाजुस पाण्याची टाकी बांधकाम करणे व पश्चिम बाजुकडील स्वच्छतागृहास पाणीपुरवठा करणे, मुख्य बाजार आवार,चांदवड येथील आवारातील अंतर्गत रस्त्याचा सेलहॉललगतचा दर्शनी भाग कॉक्रीटीकरण करणे, अद्यावत मुख्य प्रवेशद्वाराची उभारणी करणे, मुख्य कार्यालयासमोरील स्वच्छतागृहापासुन ते दक्षिण हद्दीपर्यंत ड्रेनेज लाईनची व्यवस्था करणे, या विकास कामांचे नियोजन केलेले असुन सदर कामांना नियमाप्रमाणे कलम 12 (1) ची मंजुरी मिळणेकामी वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव सादर केलेले आहे. मंजुरी मिळताच शासनाच्या नियमाप्रमाणे ई-टेंडरींग पद्धतीने विकास कामांना सुरुवात होणार आहे. त्याचप्रमाणे बाजार समितीतील प्रलंबित असलेली विविध कामांचा पाठपुरावा करुन कामे वेळीच मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यात सभापती पदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर पेट्रोल पंप उभारणीसाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मिळणेकामी पाठपुरावा करुन त्याकामी आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता संबंधित विभागास करुन दिलेली आहे. लवकरच पेट्रोल पंप उभारणीची कार्यवाही करण्यात येईल. तसेच शेतक-यांना माफक दरात माती पाणी परिक्षणासाठी प्रयोगशाळा उभारणी केलेली असुन त्यांस शासनाची मंजुरी प्राप्त होताच प्रयोशाळा सुरु करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रायपुर, धोडांबे येथे मुलभूत सुविधा उभारणी करुन कांदा, भुसार, टोमॅटो या शेतीमालाचे लिलाव सुरु करण्यार असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी उपस्थित शेतकरी प्रतिनिधी यांनी मागील 10 ते 12 दिवसांपासुन कांदा लिलाव बंद आहेत, त्यामुळे शेतक-यांना कांदा विक्रीस मोठ्या अडचणी येत आहेत. तरी लवकरात लवकर कांदा लिलाव सुरु करण्यात यावा, अशी मागणी केली. यावेळी बाजार समितीचे संचालक श्री.शिरिषकुमार कोत्तवाल यांनी कांदा व्यापारी असोशिएशन यांची सोमवारी बैठक घेऊन मंगळवारपासुन कांदा लिलाव सुरु करण्यात कार्यवाही करण्यात असे आश्वासित केले.

तसेच या दरम्यान त्यांनी बाजार समितीचे प्रस्तावित उपबाजार सुरु करण्यात येणार असल्याबाबत सांगितले, सद्यस्थितीत रासायनिक खते, बी-बियाणे इ.चे मोठ्याप्रमाणात भाव वाढलेले आहे, त्या तुलनेत शेतीमालाला बाजारभाव मिळत नाही. केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतक-यांना तोट्यात शेती करावी लागत असल्याची खंत व्यक्त केली. त्यानंतर संचालक श्री. नितीन आहेर यांनी सभेस उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानुन सभा संपल्याचे जाहीर केले.
यावेळी समितीचे उपसभापती कारभारी आहेर, संचालक सर्वश्री सयाजीराव गायकवाड, सुखदेव जाधव, योगेश ढोमसे, राजेंद्र दवंडे, पंढरीनाथ खताळ, वैशाली जाधव, मिना शिरसाठ, शिरिषकुमार कोतवाल, विक्रम मार्कंड, नितीन आहेर, सुशिल पलोड, रविंद्र पवार, सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे तसेच समितीचे कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत, वि.का.से.सह.सोसायटींचे प्रतिनिधी, व्यापारी व माथाडी कामगार प्रतिनिधी बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी व समितीचे इतर घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या