[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

अमृत वाटिका आपल्या भावी पिढ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमानाची भावना जागृत करेल :- डॉ. भारती पवार

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

अमृत वाटिका आपल्या भावी पिढ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमानाची भावना जागृत करेल :- डॉ. भारती पवार

चांदवड येथे ‘ मेरी माटी मेरा देश ‘ अंतर्गत “अमृत कलश यात्रा ” यात्रेत केंद्रीय मंत्री नामदार भारतीताई पवार व आमदार डॉ.राहुल दादा आहेर सहभागी….
देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी सर्व नागरिकांनी व तालुक्यातून सर्व ग्रामपंचायतींचे अमृत कलश या यात्रेत सहभागी झाले विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी नाना प्रकारची वेशभूषा करीत या अमृत कलश यात्रेत अनेक मान्यवरांसह सहभाग नोंदवला….
दिल्ली येथे निर्माण होणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, हुतात्मे आणि शहीद जवान यांच्या स्मारकासाठी हा मातीचा कलश जिल्हा प्रशासनाकडून जाणार आहे. भारत देशाची प्राचीन संस्कृती आणि प्राचीन कला पुढे नेण्याचं काम या निमित्ताने होणार असून हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक व राष्ट्रीय भावना जोडण्याचं काम हा कलश करणार आहे देशातील प्रत्येक गावागावातून अमृत कलश दिल्लीत जाणार आहे असे डॉ.भारती पवार यांनी सांगितले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ, जिल्हा सरचिटणीस भूषण कासलीवाल, भाजप जिल्हा उपाअध्यक्ष मोहन शर्मा, जिल्हा उपाध्यक्ष सचिन निकम, जिल्हा सरचिटणीस डॉ.नितीन गांगुर्डे, भाजप जेष्ठ नेते पंढरीनाथ खताळ, भाजप जेष्ठ नेते अशोक काका व्यवहारे, मा.सभापती डॉ.आत्माराम कुंभार्डे पंचायत ग्राम विकास अरुण देवडे, भाजप अध्यक्ष मनोज शिंदे, महिला मोर्चा अध्यक्ष गीता ताई झाल्टे, मा.सभापती पुष्पाताई धाकराव, मंजूर भाई मुलानी, बाजीराव वानखेडे, किरण बोरसे संजय पाडवी, कैलास गुंजाळ, अमर मापारी, वाल्मिक वानखेडे, योगेश ढोमसे, विजय धाकराव, डॉ.भाऊराव देवरे, निलेश काळे, मुकेश आहेर, गोरख ढगे, आत्माराम खताळ, वाल्मिक पवार, दिगंबर वाघ, उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार मंदार कुलकर्णी, गटविकास अधिकारी श्रीमती. स्नेहल लाड, सुनील पाटील, आर एस पाटील सर, मंजुषा लोखंडे जाधव, राधेश्याम चव्हाण सर तसेच चांदवड तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच, पंचायत समितीचे सर्व ग्रामसेवक, कर्मचारी, शिक्षण वृंद व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

 

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या