चांदवड बाजार समितीत झेंडू फुले लिलावास शेतक-यांचा चांगला प्रतिसाद – सभापती संजय जाधव
चांदवड बाजार समितीचे मुख्य बाजार आवार,चांदवड येथे दरवर्षी नवरात्र व दिपावली उत्सवात झेंडू फुलांचे हंगामी स्वरुपात लिलाव केले जातात. त्यानुसार बाजार समितीचे आवारावर सभापती संजय दगुजी जाधव यांचे उपस्थितीत रविवार दि.22/10/2023 रोजी झेंडू फुलांचे लिलाव सुरु करण्यात आलेले आहेत.

यावेळी तालुक्यातूनच नव्हे, तर बाहेरील तालुक्यातून देखील शेतक-यांनी फुले विक्रीस आणलेली होती. बाजार समितीचे कार्यक्षेत्रामध्ये जोडशेती म्हणुन झेंडू फुलांचे दर्जेदार उत्पादन घेतले जाते. यावर्षी प्रतिकुल परिस्थितीत देखील शेतक-यांनी फुलांचे उत्पादन घेतलेले आहे. परंतु सद्यस्थितीतील खराब हवामान व पावसांमुळे फुलांची गुणवत्ता कमी झालेली आहे.
बाजार समितीत फुले खरेदीसाठी मुंबई, कल्याण, गुजरात, दादर, नाशिक येथील व्यापारी उपस्थित राहत असुन नवरात उत्सवात दि.23/10/2023 रोजी दु.4 वा दि.24/10/2023 रोजी सकाळी 7.30 वा. तसेच दिपावली उत्सवात दि.10/11/2023, दि.11/11/2023 या दिवशी दु.04.00 वा.व दि.12/11/2023 रोजी सकाळी 7.30 वा. फुलांचे लिलाव सुरु राहणार आहेत.
झेंडू फुलांचे लिलाव शुभारंभ प्रसंगी संचालक राजेंद्र दवंडे, गणेश निंबाळकर सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे, डॉ.शामराव जाधव, व्यापारी सुनिल जगताप, जितेंद्र जैन, विशाल खांदे, उमेश आहेर, रुपेश मिसर, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फुले विक्रीची रक्कम रोख स्वरुपात अदा करण्यात येत असुन फुले मोकळ्या स्वरुपात किंवा क्रेटसमध्ये मोठ्याप्रमाणात विक्रीस आणावा, फुले विक्री संदर्भात काही सुचना अगर तक्रार असल्यास त्वरीत बाजार समिती कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन सभापती श्री. संजय दगुजी जाधव उपसभापती कारभारी आहेर व सर्व संचालक मंडळ यांनी केले.

