महाविकास आघाडी तर्फे दुष्काळी मोर्चा
चांदवड व देवळा तालुक्यातील बहुतांशी गावांची पिक आणेवारी 50 पैशांच्या आत आहे. तसेच चांदवड व देवळा तालुका हा नेहमी दुष्काळी तालुका म्हणुन ओळखला जातो. यावर्षी दोनही तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी झालेले आहे. चांदवड-देवळा तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे.
पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चा-याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. दुष्काळाची भयानकता बघता, यावर्षी दोन ते तीन वेळा पेरणी करुनही उभी पिके जळालेली आहे,असे असतांनाही शासनाकडुन जाहीर केलेल्या दुष्काळ यादीत चांदवड व देवळा तालुक्याचा समावेश नसल्याने तालुक्यातील शेतक-यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे. चांदवड व देवळा तालुक्यातील दुष्काळ कुणालाचा दिसला नाही का ? असा प्रश्न शेतकरी बांधव विचारत आहेत. तसेच चांदवड-देवळा तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी बघ्याची भुमिका घेतल्याने या तालुक्यातील जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहचविण्यासाठी महाविकास आघाडी तर्फे चांदवड व देवळा तालुका दुष्काळ जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी आज सोमवार दि.06/11/2023 रोजी दुष्काळ मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

दुष्काळी मोर्चातील प्रमुख मागण्या
1. चांदवड-देवळा तालुका दुष्काळी तालुका म्हणुन जाहीर करावे.
2. कांदा अनुदान वितरणाची प्रक्रिया जलदगतीने राबवून शेतक-यांच्या खात्यावर संपुर्ण कांदा अनुदान वर्ग करावे.
3. सरसरकट पिक विमा भरपाई मिळावी.
4. शेतक-यांना 100 टक्के सरसकट कर्ज माफी देण्यात यावी.
5. सन 2021 मध्ये व मागील वर्षात अति पावसाने नुकसान झालेल्या सर्व शेतक-यांना भरपाईची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे राहिलेल्या शेतक-यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम मिळावी.
6. दुष्काळग्रस्त शेतक-यांचे 100 टक्के वीज बिल माफ करुन विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी.
7. चांदवड व देवळा तालुक्यासाठी पिण्याचे पाणी राखीव ठेवावे.
8. जनावरांसाठी चारा उपलब्ध करुन द्यावा.
9. दुष्काळाच्या दृष्टीने उपाय योजना करण्यात याव्यात.
10. कांद्याची अघोषित निर्यात बंदी उठवावी व कांद्यावरील MEP रद्द करावी.
11. मका रु.4000/- व सोयाबिन रु.8000/- याप्रमाणे हमीभाव जाहीर करावा.
वरीलप्रमाणे मागण्या मान्य न झाल्यास महाविकास आघाडीतर्फे शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरुन जनआंदोलने केल्याशिवाय राहणार नाही, यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. तरी याबाबत आपण वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनास सादर करुन चांदवड व देवळा तालुक्याचा दुष्काळी तालुका म्हणुन जाहीर करणेकामी उपाय योजना व्हाव्यात

शिरिषकुमार कोतवाल, संजय दगुजी जाधव, डॉ.सयाजीराव गायकवाड, नितीन आहेर, कारभारी आहेर, विलास भवर, सोमनाथ पगार,समाधान जामदार,शिवाजी कासव, दत्तात्रय वाघचौरे, राहुल कोतवाल, उत्तम ठोंबरे, सुरज चिंचोले, नवनाथ आहेर, विक्रम जगताप, विजय गांगुर्डे, ॲड. भरत ठाकरे, सागर साठे, अनिल ठोके, संदिप कोकणे, दत्तु शेळके, विलास संसारे, शंभुराजे खैरे, सुभाष जाधव, शेख रिजवान, अल्ताफ तांबोळी, शामराव जाधव, सुरेश कोतवाल, सुभाष शिंदे, शैलेश ठाकरे, राजाराम जाधव, दिपांशु जाधव, छबु गांगुर्डे, भाऊसाहेब शेलार, बाळासाहेब शिंदे, शंकर महाले, अशोक बाराहाते, बाळु आहेर, अरुण थोरमिसे, बाबाजी वाकचौरे, अनिल पाटील, सोमनाथ पाटील, निवृत्ती वाकचौरे, चंद्रकांत देवरे, राजेंद्र दवंडे, साहेबराव चव्हाण, माधव देवरे, प्रसाद प्रजापत, कैलास देवरे शिवाजी आहेर, विलास जाधव, विकास आहेर, रामनाथ घाटे, सर्जेराव शिंदे, सतिष जाधव, सुभाष जाधव आदिंसह शेतकरी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

