कांद्याच्या दरात होत असलेली चढ – उतार : केंद्रीय पथकाने शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचत केली सद्यस्थितीत पाहणी
कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा..
देशांतर्गत कांद्याला असलेली मागणी व त्या तुलनेत कमी होणारा पुरवठा तसेच कांदा दरात सातत्याने होत असलेले चढ उतारामागे नेमके कारण काय ? हे शोधण्यासाठी आज नाशिकच्या चांदवड तालुक्यातील दुगाव येथे केंद्रीय पथकाने पाहणी केली..या पाहणीत त्यांनी थेट शेताच्या बांधावर जात कांदा पिकांची सद्यस्थितीत असलेली अवस्था बघितली..केंद्र सरकाराच्या कांदा विरोधी धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी उध्वस्त झाला आहे..
नाफेड, एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेला कांदा हा शेतकऱ्याचा नसून व्यापाऱ्यांचा आहे..कांदा साठवणूकीसाठी शेतकऱ्यांना सबसिडी देण्याची मागणी तसेच दुष्काळी परिस्थितीसह अनेक व्यथा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या पथकासमोर दुष्काळी हेक्टरी लाख रुपये खर्च करून कांदा लागवड करायची पण कांदा उत्पादनच होत नसल्याने हाती एक रुपया पडणे देखील मुश्किल झाल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले..केंद्रीय ग्राहक संरक्षण विभागाचे संचालक सुभाषचंद्र मिना व कृषी मंत्रालयाचे सहआयुक्त बी.के.पोष्टी यांचेसह उपस्थित अधिकारी वर्गाने शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत केंद्राला तसा अहवाल पाठविण्यात येईल असे सांगितले..

