[masterslider id="2"]
मुख्य बातमी संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

वादळी पाऊस व गारांच्या तडाख्याने चांदवड तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

वादळी पाऊस व गारांचा तडाख्याने चांदवड तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

जेव्हा पडायचा तेव्हा नाही आला आता प्रचंड नासाडी करुन होते नव्हते ते चिंब चिंब भिजवुन गेला.

दि २६ रोजी प्रचंड वादळ वारा, अतोनात गारांचा वर्षाव होऊन चांदवड तालुक्यातील पूर्व भागात गारांचा बे- मोसमी पावसाने झोडपले.
वादळ गार पिटिने शेतातील कांदा चाळीतील साठवलेला कांदा, किट्टी केलेला चारा ,रचलेला चारा, हे सर्व गारा आणी वारा या मुळे भिजुन चिंब झाले. आधीच दुष्काळ आणि त्यात आता वादळाचा तडाखा बसला आहे. या भागात पाणी टंचाई आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची पिके आधीच जळून गेलेली आहे. काही मोजक्या शेतकऱ्यांनी रेनगन, ठिबक व शेततळ्यात साठविलेल्या पाण्याचा अत्यंत काटेकोर वापर करून कांदा, द्राक्ष व ईतर पिके कशीबशी जगवली मात्र या वादळाने सर्व होत्याचे नव्हते करून टाकले.

दुपारनंतर पाऊसाला सुरुवात झाली सुरुवातीला १५ मिनीटे झिमझिम पाऊस नंतर त्या पाठोपाठ वादळ वारा त्यांच्या संहीत प्रचंड गारांनी तालुक्यातील पूर्व भागात एक ना एक गाव अक्षरशा झोडपुन काढले, या शेतकर्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले या पावसामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत होता .

दुष्काळाने पोळलेला शेतकरी पावसाने पुरता कोलमडला गेला झालेल्या नुकासनीमुळे शब्द देखील उरले नाही अशा संताप जनक प्रतिक्रिया उमटल्या
वाऱ्या सोबत गारांचा एवढा पाऊस होता की शेतातील घराच्या दरवाजाच काय पण खिडकी देखील उघडली जात नसे एवढ्या प्रमाणात चक्रीवादळ घोंगावत होत, पञ्यांच्या छतावर आणी जमिनवर पडलेली गार दोन ते तिन इंच जाडीची होती.आनेकांनी गारा हातात, घेऊन दाखवल्या या दरम्यान उघड्यावरील जनावरे चांगलीच पाऊसा व गारांनी झोडपली गेली. या गारपिटीने प्रचंड हाणी झाली आता जनावरांना चारा उरला नाही कांदा पिके फोडुन काढली डाळिंबा,द्राक्षे, चारा पिके,चारा कुट्टूि, ,भुस,भुईमुंग शेंग,शेतात पडून आसलेली मका बिट्टी, ,सह विविध पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातील पूर्व भागातील दरेगाव, निमोन, वाद, वराडी, डोनगाव,कानडगाव कुंदलगाव ,दहेगाव शिंगवे ,वागदर्डी, वडगाव पंगु, कातरवाडी तळेगाव रोही रायपूर भडाने ,निंबाळे, मेसनखेडे, दुगाव, वाकी, साळसाने, कोकणखेडे यास अजून काही माहिती न मिळालेल्या अनेक गावात या वादळी पावसाने नुकसान केले आहे शेतकऱ्यांचे झालेले नुस्कारांची त्वरित पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या