बी बियाणं पासून ते अत्याधुनिक मशिनरीपर्यंत शेतकऱ्यांसाठी सर्वकाही ! चांदवडच्या रेणुका कृषी महोत्सवमध्ये. आत्माराम कुंभार्डे यांच्या संकल्पनेतून दि.30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर पर्यंत
आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉक्टर आत्माराम कुंभार्डे यांच्या संकल्पनेतून चांदवड येथे प्रथमच रेणुका कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे प्रदर्शनाचा उद्देश चांदवड, देवळा, मनमाड, सटाणा, लासलगाव, निफाड, नांदगाव कळवणसह परिसरातील सर्व शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन, पॉलिहाऊस, नवनवीन बियाणे, नवीन यंत्रसामुग्री, महाराष्ट्र शासनान कृषी विभागाच्या विविध योजना, बँकिंगच्या विविध स्कीम, बचत गटातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे, शेतीपूरक नवीन उद्योजकांची माहिती, कांदा पीक, द्राक्ष पिक त्याचबरोबर मका या पिकांवरती तज्ञांचे मार्गदर्शन शिबिरे या सर्व गोष्टींचे आयोजन या कृषी प्रदर्शनाद्वारे होणार आहे तरी दिनांक 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शन आयोजित केले असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचावी व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रदर्शन ठिकाणी प्रदर्शन पाहण्यासाठी यावे
असे आवाहन डॉ. आत्माराम कुंभार्डे
मा. सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड मा. गटनेते नाशिक जिल्हा परिषद यांनी केले आहे सदर प्रदर्शनाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य नामदार दादाजी भुसे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर राहुल आहेर हे राहणार आहे .तर प्रमुख उपस्थिती आरोग्य राज्यमंत्री नामदार डॉक्टर भारतीताई पवार यांची राहणार आहे.शेतकरी बांधवांना शेतीमधला नफा वाढवायचाय?
मग तुमच्यासाठी सुवर्णसंधी!
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त चांदवडमध्ये प्रथमच कृषि प्रक्रिया यंत्रसामुग्री व कृषि औद्योगिक प्रदर्शन
रेणुका कृषि महोत्सव, चांदवड
बी-बियाणांपासून शेतीमाल ते अत्याधुनिक मशिनरीपर्यंत शेतकऱ्यांसाठी सर्वकाही!
इथे असतील खते, आधुनिक तंत्रज्ञान, औषधे, बी-बियाणे, अवजारे, यंत्रसामग्री, ट्रॅक्टर्स, फार्म इक्विपमेंट, सिंचन, फलोत्पादन,पॅकेजिंग, साठवणूक, शासकीय विभाग, ऍक्वाकल्चर, बायोटेक्नॉलॉजी, टिश्यू कल्चर, पाणी व्यवस्थापन, ऑटोफार्मिंग टेक्नॉलॉजी, सौर ऊर्जा, डेअरी इक्विपमेंट, पोल्ट्री सोल्युशन, कृषी अर्थसहायय, कृषी साहित्य, नियतकालिके असे अनेक स्टॉल असणार आहेत.शिवाय लाखो लोकांची रेलचेल व दररोज तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कांदा, द्राक्षे आणि मका या पिकांविषयी परिसंवाद व दुष्काळी भागांमध्ये पिकांसाठी पाण्याच्या योग्य नियोजनाबाबत मार्गदर्शन
२०० हुन अधिक कंपन्यांचा समावेश राहणार आहे. सदर प्रदर्शनाचे ठिकाण
कृषि उत्पन्न बाजार समिती चांदवड, जि. नाशिक या ठिकाणी
दि. ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे
तेव्हा शेतकरी बांधवांनो, नक्की भेट द्या!आणि शेतीमधला नफा वाढवा! असे आवाहन डॉ आत्माराम कुंभार्डे यांनी केले आहे.नियोजक: Wable’s Event तर आयोजक: महाराष्ट्र शासन कृषि विभाग, जिल्हा परिषद नाशिक, आत्मा विभाग आणि संजीवनी बहुउद्देशीय संस्था चांदवड, जि. नाशिक हे आहेत. व सदर प्रदर्शनाचे प्रायोजक बसवंत गार्डन कृषी उद्योग व सहाप्रयोज मे जाधव आणि कंपनी चांदवड हे आहेत.

