[masterslider id="2"]
मुख्य बातमी संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी चांदवडला देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन संपन्न

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

 

चांदवड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व देशाचे माजी माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत चांदवड येथील मुंबई- आग्रा महामार्गावरील पेट्रोल पंप चौफुली जवळ हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कांदा निर्यात बंदी त्वरित उठवण्यात यावी या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या या अडचणीच्या काळात 84 वर्षीय शरद पवार स्वतः आंदोलनात उतरल्याने या आंदोलनाचा एक विशेष महत्त्व आले होते .

आजच्या चांदवडच्या सभेतील शरद पवार साहेबांचे जसेच्या तसे अनकट भाषणं

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid025p5iWBfA2zk7WzusAuWpKtDEymZu7RV6a12CgPCDVC1qKGDDxTaoxpxGEKbPuptsl&id=100002390920837&mibextid=2JQ9oc

चांदवड येथे आयोजित कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी शेतकऱ्यांचा मोर्चा यातून उपस्थितांना संबोधित करताना,

उपस्थित बंधू भगिनींनो, आज अतिशय कार्यकुशलतेने या ठिकाणी तुम्ही हजारोंच्या संख्येने जमलात, उन्हातानाचा विचार केला नाही, याबद्दल मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. नाशिक जिल्हा हा या देशाच्या नकाशावरचा शेतीबाबत अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे आणि त्याचे महत्त्वाचे कारण तुम्ही उन्हातानाचा विचार न करता, घाम गाळून काळ्या आईची इमान राखण्याची भूमिका सातत्याने केली आणि त्याचा परिणाम आज फळबागांचे उत्पादन असो, कांद्याचे उत्पादन असो; देशाच्या नकाशामध्ये हाच नाशिक जिल्हा आणि हा जिल्ह्यातला शेतकरी याची नोंद त्या ठिकाणी कायम होत असते.

कांदा हे दिलदार शेतकऱ्यांचे पीक आहे, कांदा हे असे पीक आहे की, दोन पैसे त्याच्यात मिळतात त्यासाठी तुम्ही सर्व कष्ट करतात पण, दुर्दैवाने ज्यांच्या हातात देशाचे धोरण ठरवायचे अधिकार आहे या सर्वांमध्ये तुमच्या कष्टाला किंमत द्यावी ही भावना क्वचित ही नाही; केंद्र सरकारमध्ये जे सत्ताधारी बसलेले आहेत त्यांना मी जाऊन विचारेल, शेतकरी उध्वस्त व्हायला वेळ लागत नाही आणि ही अवस्था आज झाली.

मला आठवतंय, खूप वर्षांपूर्वी मी मनमाडला आलो होतो आणि तिथे आल्यानंतर तिथल्या स्थानिक लोकांनी मला सांगितलं की, कांद्याच्या संबंधित केंद्र सरकारमध्ये काही वेगळा विचार होत आहे आणि त्यामुळे कांद्याच्या किंमती खाली यायला लागलेल्या आहेत. मी मनमाडचा कार्यक्रम संपवला आणि दिल्लीला पोहोचलो; अधिकाऱ्यांची बैठक बोलावली त्यांना विचारलं की, काय चालू आहे ? लोकसभेमध्ये भाजपाच्या लोकांनी कांद्याच्या किंमती वाढवल्यात म्हणून कांद्याच्या माळा गळ्यात घातल्या आणि दंगा केला, तर त्या परिस्थितीत काहीतरी निकाल घ्यायची गरज आहे; ठीक आहे निकाल घ्यायला मी आहे खंबीर; दुसऱ्या दिवशी लोकसभा सुरू झाली आणि भाजपचे लोक कांद्याच्या माळा गळ्यात घालून आले. आमच्या अध्यक्षांनी त्यांना स्पष्ट विचारलं की, हे काय चालू आहे कशासाठी चालू आहे ? तर काही लोकांनी सांगितलं की, ‘प्याज की क़ीमत इतनी बढ़ गई है कि, खाना मुश्किल हो गया है।’ अध्यक्षांनी मला विचारले सरकारचे धोरण काय? मी उत्तर दिलं की, कांदा पिकवणारा शेतकरी हा लहान शेतकरी आहे, तो दिलदार शेतकरी आहे त्याला कधीतरी दोन पैसे मिळतात ते आत्ता मिळाले तर यात दंगा करायचे कारण नाही. तुमच्या रोजच्या अन्नामध्ये जो काही खर्च होतो त्यात ज्वारीची भाकरी, गव्हाची चपाती, बाजरी, मसाले असो हा सर्व खर्च जर काढला आणि जेवणामध्ये कांदा कापून थोडा आपण वापर केला तर त्या कांद्याचा खर्च किती ? सबंध जेवणामध्ये उत्तर काय आलं नाही आणि तुम्ही मला विचारलं की, धोरण काय तर, धोरण कांद्याच्या माळा गळ्यात घाला नाहीतर काहीही करा, कांद्याची किंमत कमी होणार नाही निर्यात बंदी होणार नाही आणि शेतकऱ्याला कांद्याची ऱ्हास्त किंमत जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही लोक स्वस्त बसणार नाही हा निकाल त्यावेळी आम्ही घेतला. आणि आज फक्त चर्चा चाललेली आहे ‘बहुत महीना हो गया, खाना मुश्किल हो गया’ खाना मुश्किल झालंय तर, नका खाऊ कधीतरी शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले तर लगेच तुम्ही मोर्चे काढतात; केंद्राने निकाल घेतला, पहिला निकाल घेतला की, जीएसटी लावायचा ४०% आणि त्यानंतर आदळ आपट सुरु झाली आता तर काय निर्यातीचा, की कांदा निर्यातच करायचा नाही, बाहेरच्या देशात पाठवायचा नाही आणि हा एक निर्णय संपूर्ण बंदीचा; हा निर्णय शेतकऱ्यांचा संसार उध्वस्त करणारा आहे आणि त्यामुळे कांद्याच्या निर्यातीची बंदी ही उठवलीच पाहिजे.

आज या ठिकाणी आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरून बसलोय ही काही आम्हाला हौस नाही, लोकांना त्रास द्यावा असे वाटत नाही, पण हे केल्याशिवाय दिल्लीला कळत नाही. आज या ठिकाणी आपण सर्व जमलोत काही लोक बोललेत, माझी खात्री आहे की, दिल्लीला त्यांची झोप उडालेली असेल; आज सकाळपासून मी टीव्ही बघतोय की केंद्रासोबत आम्ही चर्चा करणार, आम्ही हा निर्णय बदलणार, आम्ही शेतकऱ्यांना न्याय देणार. याआधी हे सर्व ठरलं होतं त्यावेळेस त्यांना आठवण आली नाही पण, जेव्हा त्यांना कळलं की, चांदवडला सगळे लोक एकत्र येऊन रस्त्यावर आपली शक्ती दाखवणार आहेत; त्यावेळेस हालचाल त्या ठिकाणी सुरू झाली पण, तरी तेवढ्यात समाधान मानायचे कारण नाही, लक्ष ठेवावे लागेल, हे सध्याचे राज्यकर्ते हे शेतकऱ्यांसाठी योग्य धोरण आखणारे नाही आहेत. आत्ता येता येताच काही लोकांनी मला निवेदने दिलीत, निफाड तालुक्यातील लोकांनी मला सांगितलं की, २६ तारखेला प्रचंड पाऊस झाला गारपीट झाली आणि त्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तयार झालेल्या द्राक्षाच्या पिकाला तडे गेले, पीक खराब झाले; हे गेल्यावर्षी देखील झाले आणि यंदाही झाले आणि त्यामुळे आज हा शेतकरी संकटात आला, एवढं झाल्यानंतर सरकारने मदत करायची परंतु, सरकारने नवीन निकाल हाती घेतला, इथली द्राक्ष बांग्लादेशात जातात; आता बांग्लादेशच्या सरकारने या द्राक्षांवर १६० रुपयांची ड्युटी बसवली. आज बांग्लादेश एवढा- एवढा आहे, तो देश आमच्यावर ड्युटी बसवतो, आणि त्यात आमचे सरकार बघत नाही आणि असेच ड्युटी बसवले तर या किंमतीत शेतकरी वाचू शकत नाही, तो उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही.

नाशिक जिल्ह्यात साखर कारखाने कमी आहेत पण, महाराष्ट्र देशात दोन नंबरचा कारखानदारी करणारा साखर तयार करणारे राज्य; आपण काय करतो, ऊस लावतो त्यानंतर त्याचा रस काढून त्यातून साखर तयार करतो ते करत असताना मळी शिल्लक राहते त्यापासून इथेनॉल नावाचं पेट्रोलमध्ये मिक्स करता येणारे असे रसायन तयार होते आणि त्यामुळे शेतकऱ्याला उसाची किंमत करत असताना साखरेची, विजेची, इथेनॉलची किंमत मिळते आणि त्यामुळे हा धंदा वाढतो गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने निकाल घेतला की, तुम्ही इथेनॉल हे या ठिकाणी बनवायचं नाही आणि बनवायचं असेल तर त्यासाठी उसाचा रस आणि साखरेचे सिरप यावर आम्ही बंदी आणतो त्यामुळे आणखीन अडचणी निर्माण झाल्या. या व्यतिरिक्त आणखीन अजून निकाल घेतले, हे निकाल सहजच घेतले जातात, हे निकाल घेत असताना शेतकऱ्याच्या हिताचा विचार करणे, ही भूमिका याची नोंद कधीच या ठिकाणी घेतली जात नाही आणि त्याचा परिणाम हा संबंध शेती आणि शेतकऱ्यांवर झालेला आहे.

चांदवडच्या कृषी बाजार समितीच्या वतीने मला संजय जाधव सभापती यांच्या सहीचे एक निवेदन मिळाले ते काय बोलतात तर, कांद्याला लागू केलेली निर्यात बंदी तात्काळ मागे घ्या, कांदा अनुदानाची प्रक्रिया राबवून शेतकऱ्यांच्या खात्यात संपूर्ण अनुदान वर्ग करा, सरसकट पिकविमा भरपाई द्या, १००% शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या आणि इतर जी काही दुष्काळामुळे स्थिती निर्माण झाली त्यातून सावरण्यासाठी हातभार लावा. हे पत्रक फक्त चांदवड पुरते नाहीतर सबंध महाराष्ट्रासाठी, देशासाठी आहे आणि त्यामुळे आज राज्यकर्ते या प्रश्नांकडे पाहत असताना न्यायाने बघत नसतील तर आपल्याला सामुदायिक शक्ती ही दाखवावी लागेल आणि हे नाशिक करू शकते, कारण या देशात शेतकऱ्यांची सामुदायिक शक्ती ही वाढण्यासाठी या जिल्ह्याने एक प्रकारचा वेगळा कार्यक्रम राबवला त्यात नाशिकचे नाव घ्यावे लागते.

मला आठवते एक २५-३० वर्षांपूर्वी प्रश्न निर्माण झाला होता की, शरद जोशी नावाचे एक नेते तुमच्या जिल्ह्यात फिरले आणि शेतकऱ्यांशी संपर्क ठेवला आणि सामुदायिक शक्ती ही उभी करून शेतकऱ्यांची ताकद काय असते ही सरकारला दाखवली आणि ती सबंध देशाला कळली आणि त्यामुळे त्यानंतर अनेक आंदोलने या देशात झाली हे शेतकऱ्यांचे आंदोलने त्या मागची प्रेरणा ही नाशिक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या कष्टाची होती आणि त्या दृष्टीने हा हिशोब तुम्ही घडवणारे लोक आहात तसाच विचार आपल्याला घडवायचा आहे आणि त्यासाठी आपण या ठिकाणी आलो.

आजच्या या कार्यक्रमामुळे केंद्र सरकारला संदेश गेला, उद्या मी दिल्लीला जाईल पार्लमेंट सुरू होईल आणि पार्लमेंट मध्ये जे कोणी संबंधित असतील त्यांना नाशिकच्या लोकांचे दुःख त्या ठिकाणी सांगितले जाईल आणि जर हे सर्व करून सरकार बघ्याची भूमिका घेणार असेल तर, पुन्हा एकदा या लोकांना अक्कल सुचवायचे काम हे तुम्हा आम्हाला करावे लागेल त्यासाठी तयार रहा. इथे राजकारण नाही, इथे फक्त काळ्या आईची इमान राखून त्याला सन्मानाने जगता येईल एवढेच आपल्याला करायचे आहे आणि ते आपण मिळून करू एवढे सांगून मी माझे दोन शब्द संपवतो. याप्रकारे मार्गदर्शन त्यांनी आपल्या भाषणात केले.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे , माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, माजी आमदार उत्तमबाबा भालेराव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय जाधव, शिवसेनेचे जिल्हाउपप्रमुख नितीनदादा आहेर,डॉक्टर डी. एल .कराड, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, शिवसेनेचे गणेश धात्रक, माजी आमदार दीपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण,, गजानन शेलार, , माजी आमदार अनिल कदम , राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, माजी आमदार जगन्नाथ धात्रक, माजी आमदार हेमंत टकले, माजी आमदार नितीन भोसले, माणिकराव शिंदे, गोकुळ पिंगळे, दत्तात्रय पाटील , शिवसेनेचे तालुका अध्यक्ष विलास भवर, खंडेराव आहेर विजय जाधव, ,संगीता पाटील ,अवंती राठोड, भारतीताई देशमुख,कविता पवार , साधना पाटील उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी माननीय शरद पवार साहेब यांच्याकडे केली . यावेळी त्यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या कारभारावर आसूड ओढले. यावेळी शेतकऱ्यांची संवाद साधताना शिरीष कुमार कोतवाल यांचा कंठ भरून आला आणि भावनिक होऊन आपले भाषण पूर्ण केले. तसेच तालुक्यात यापुढे शरद पवार देतील तो उमेदवार सर्वांनी निवडून आणावा, असे आवाहन केले.
यावेळी श्रीराम शेटे, डॉ. डी. एल.कराड,माणिकराव शिंदे, अनिल कदम, . सटाण्याच्या माजी आमदार दीपिका चव्हाण, सयाजीराव गायकवाड, नितिनदादा आहेर आदी वक्त्यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचायत समितीचे माजी उपसभापती दिलीप धाराराव राष्ट्रवादीचे सरचिटणीस विजय जाधव यांनी केले. रस्त्याच्या दुर्तफा बाजूला वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. यावेळी नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील व ईतर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय वाघचौरे,विजय जाधव,सुकदेव जाधव शैलेश ठाकरे, अनिल पाटील, शिवाजी सोनवणे, परसराम निकम ,संदीप शिंदे, रिजवान घाशी,ज्ञानेश्वर शिंदे, आर . डी.थोरात, विक्रम जगताप, प्रा.सुरेश गुंजाळ, , भिमराव जेजुरे, अनिल ठोके,अरुण न्याहरकर, कारभारी आहेर,अमोल भालेराव,प्रकाश शेळके , राहुल कोतवाल, कैलास कोतवाल,रिजवान घाशी , म्हसू गागरे , , रावसाहेब भालेराव, डॉ.शामराव जाधव,महेश देशमाने, दिपांशू जाधव, शंभूराजे खैरे, सुभाष जाधव, अभिजीत ठाकरे, भूषण शेळके, भास्कर भगरे, शाहू शिंदे, तोफिक मनियार,मतीन घाशि , सुदाम लांडगे, रमाकांत शिंदे, सुधीर कबाडे, विलास माळी, जगदीश शेळके, राजू ठोंबरे, सुदाम केदारे, रामनाथ ठाकरे, रावसाहेब देवरे, माधव देवरे, अभिमन्यू ठाकरे, सागर साठे, रामनाथ ठाकरे, केलास झाल्टे, मधुकर गोसावी, रवी शिंदे , रोनक कबाडे, घमाजीराजे सोनवणे, नामदेवराव पवार, खंडेराव सोमवंशी, गोरख शिंदे, रघुनाथ वाघमोडे यांच्यासह हजारो पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या