दूगाव सोसायटीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
चांदवड तालुक्यातील दूगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने यावर्षी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे. त्यात त्यांनी सोसायटीचे चेअरमन सतीश दिनकरराव सोनवणे यांच्या संकल्पनेतून सोसायटीतर्फे सन 2024 दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे .सदर दिनदर्शिका प्रकाशन सोहळा सोसायटीच्या कार्यालयात पार पडला . जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर सयाजीराव गायकवाड पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोनवणे , महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव सोनवणे, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विनायक सोनवणे , खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन भाऊसाहेब शेलार,माजी उपसभापती यू.के.आहेर,मनसेच्या महिला आघाडी च्या वैशाली सोनवणे ,सरपंच संजय गांधी, माजी सरपंच प्रकाश सोनवणे उपसरपंच अलका सोनवणे , निलेश सोनवणे ,रावसाहेब सोनवणे ,प्रकाश सोनवणे, नवनाथ सोनवणे, पोलीस पाटील रवींद्र सोनवणे,पी. के. सोनवणे , ,कडू सोनवणे , राजू शिंदे ,ज्ञानेश्वर सोनवणे , आदीच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. 
विविध कार्यकारणी सोसायटी चे चेअरमन व सर्व सदस्य कर्मचारी व गावकरी ग्रामस्थ यांच्यातर्फे 2024 चे कॅलेंडर वितरण चा हा कार्यक्रम घेण्यात आला . यावेळी सर्वांना निमंत्रण देऊन शाल फुलगुच्छ तसेच पेन व डायरी व दिनदर्शिका देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला चांदवड कृषी उत्पादन बाजार समितीचे संचालक डॉ सयाजीराव गायकवाड यांनी यावेळी दुगाव सोसायटीचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य उपक्रम असून सहकारात असे वेगवेगळे उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी बाबुराव सोनवणे, विनायक पाटील, बाळासाहेब सोनवणे, सतीश सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सभापती यू.के.आहेर तर आभार चेअरमन सतीश सोनवणे यांनी मानले. यावेळी सोसायटीचे व्हा.चेअरमन सौ. रत्नाबाई सोनवणे ,संचालक त्र्यंबक सोनवणे, भगवान मंडलिक , आरिफ शेख, एकनाथ सोनवणे, नारायण सोनवणे ,शंकर सोनवणे, शशिकांत सोनवणे ,ताराबाई गायकवाड, दत्तू आहेर ,केदू खरात ,कांतीलाल जाधव , सचिव दीपक शिंदे , कर्मचारी संतोष सोनवणे ,वैभव तांबे आदी उपस्थित होते.

