संतोष गवई यांच्याकडे समता शिक्षक परिषदेच्या राज्याध्यक्ष पदाचा कार्यभार
राज्य महासचिव समता शिक्षक परिषद राज्य शाखेचा
राज्य अध्यक्ष पदाचा पदभार संभाळणे बाबतचे पत्र संतोष विश्वनाथ गवई यांना देण्यात आले आहे.
पत्रात म्हटले आहे की,आपणास सुचित करण्यात येते की, राज्य अध्यक्ष हे पद श्री. राजेंद्र गायकवाड यांच्याकडे होते परंतू नियत वयोमानाने सेवा निवृत्त झाल्यामुळे राज्य शाखेच्या घटने प्रमाणे राज्य महासचिव संतोष विश्वनाथ गवई यांनी राज्य अध्यक्ष पदाचा पदभार राज्य अध्यक्षपदाची जो पर्यंत नव्याने निवड होत नाही तो पर्यत अध्यक्ष पदाची सर्वस्वी जबाबदारी स्विकारुन पार पाडावी समता शिक्षक परिषदेच्या उर्वरित पदअधिकाऱ्यासोबात चर्चा करुन लवकरात लवकर राज्य अध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पाडुन संघटनेस सहकार्य करावे. असे संस्थापक , कार्याध्यक्ष तथा माजी राज्यध्यक्ष.मधुकर गोविंदराव कदम यांनी पत्राद्वारे कळवले आहे.

