किल्ले धोडप येथे शिवरायांना अनोखी वंदना…. रौद्रशंभु ट्रेकर्स.
एकी कडे शिवजयंतीला डिजेच्या तालावर नाचणारी तरुणाई असताना दुसरीकडे मात्र चांदवड निफाड तालुक्यातील काही तरुणांनी एकत्र येत शिवरायांना 394 व्या जयंतीनिमित किल्ले धोडप येथे स्वछता करून हर हर महादेव चा गजर करत शिवजयंती साजरी केली,
गेल्या पाच वर्षांपासून ह्या ठिकाणी गड कोट किल्ले संवर्धन करून शिवजयंती साजरी होत आहे.यावेळी रौद्रशंभु ट्रेकर्स चे सर्व शिलेदार, व उत्सव समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.शिवजन्मोस्तव कील्ह्यावर्ती आणि महाराष्ट्रातील किल्ले शेवटच्या घटका मोजत आहेत त्यांच संवर्धनाच महत्व सर्वांपर्यंत पोहचावे आणि पून्हा एकदा शिवकाळातील शिवजन्मोस्तव कसा असेल ह्यासाठी रौद्रशंभु ट्रेक्कर्स धोडप शिवजन्मोस्तव समिती मागच्या 4 वर्षांपासून सोहळा साजरा करतेय. तसेच ह्या 5 व्या वर्षी शिवजयंती मोठया उत्साहात साजरी झाली.
दिनांक 18 ला किल्ला फुल सजवून आणि स्वच्छता करून.
रात्री 12 वाजता किल्ल्यावर्ती दीपोत्सव मोहीम आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पालखी मिरवणूक तसेच उपस्थितांना महाप्रसाद देण्यात आला.

