माध्यमिक विद्यालय शिंगवे ता. चांदवड येथे शिवजयंती उत्साहात साजरी
आज दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी माध्यमिक विद्यालय शिंगवे ह्या विद्यालयात शिवजयंती मा. मुख्याध्यापक श्री गांगुर्डे आर.एच.यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली पाचवी ते दहावी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या मावळ्याच्या वेश बुशा तसेच विद्यार्थिनी पण नऊवारी साडी नेसून भारतीय संस्कृती प्रमाणे सहभाग घेतला तसेच इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी राजे बद्दल आपले मत व्यक्त केले
याप्रसंगी संस्थेचे सुखदेव बोरसे उपस्थित होते प्रतिमा पूजन ज्येष्ठ शिक्षक श्री पाटील सर यांनी केले तसेच याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते शिक्षकांच्या वतीने श्री माळी टि.के सर, जे. एस. वाले सर यांनी आपले विचार मांडले तसेच काही विद्यार्थ्यांनी शिवाजी राजेबद्दल पोवाडे सादर केले व अशा पद्धतीने शाळेत विद्यार्थी, पालक,शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी सर्वांच्या सहकार्याने शिवजयंती उत्साहात मोठी साजरी करण्यात आली शेवटी राज्य गीताने शिवाजीराजे जयंतीची सांगता करण्यात आली

