मराठी भाषेचे संवर्धन सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी करायला हवे : मयुर महाजन
प्रतिनिधी (यावल)
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात थोर साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला.
प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.अर्जुन पाटील उपस्थित होते.
प्रारंभी मनीषा भिलाला हिने स्वागत गीत गायन केले व दीक्षा पंडित हिने कुसुमाग्रजांची कणा कविता सादर केली.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. मयुर महाजन (सामाजिक कार्यकर्ते राजोरा) यांनी “आशा मराठीची भाषा तरुणांची” या विषयावर मार्गदर्शन करताना मराठी भाषेचा घसरता पाया, मराठी भाषेवर वेगवेगळ्या बोलींचा पडलेला प्रभाव, इंग्रजी शब्दांचा भरणा, बदलत्या काळानुसार हौशी, मौजेच्या वस्तू संदर्भात घरात वापरले जाणारे इंग्रजी शब्द ह्यावर सविस्तर मार्गदर्शन करताना तरुणाईने सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात मराठी भाषेचे ज्ञान प्रत्येकाने आचरणात आणणे गरजेचे आहे. अशी अपेक्षा व्यक्त केली
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम.डी. खैरनार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भाषा हे संवादाचे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे मराठी भाषेचा अभिमान बाळगायला हवा, समाजात वावरताना मराठी भाषेचे आचरण होणे महत्त्वाचे आहे. भाषा शुद्ध, अशुद्ध उच्चार बोलताना युवकांमध्ये आपुलकी, भाव संवर्धन होणे महत्त्वाचे आहे असे सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला डॉ. सुधीर कापडे, डॉ. हेमंत भंगाळे, डॉ. पी.व्ही. पावरा, प्रा. एकनाथ सावकारे, प्रा. मयुर सोनवणे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रजणी इंगळे यांनी केले प्रास्ताविक व आभार प्रा. सुभाष कामडी यांनी केले .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी
प्रा. नंदकिशोर बोदडे, प्रा. अक्षय सपकाळे, प्रा. नरेंद्र पाटील, डॉ. निर्मला पवार.डॉ. संतोष जाधव, प्रा. नरेंद्र पाटील, प्रा. छात्रसिंग वसावे,प्रा. रजनी इंगळे, प्रा. प्रशांत मोरे सर्व शिक्षक व शिक्षक इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

