[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

दरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत चौथीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

दरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत चौथीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरेगाव येथील २००७ च्या चौथीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला. यावेळी या वर्गातील माजी विद्यार्थी सुमारे सतरा वर्षांनी एकत्र आल्याने एक वेगळा आनंद निर्माण झाला होता. त्यावेळी सर्वांनी एकमेकाची विचारपूस करत शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी शाळेसंदर्भात झालेले बदल इत्यादी संदर्भात सविस्तर चर्चा केली तसेच आपण या शाळेचे माजी विद्यार्थी असल्याने शाळेसाठी काहीतरी मदत केली पाहिजे अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. शाळेला भव्य संरक्षण भिंत असून त्या भिंतीवर थोर महापुरुषांचे विचार व प्रतिमा रेखाटन करण्याचे ठरले व त्यासाठी आवश्यक असलेला निधी या विद्यार्थ्यांनी आपल्या सहभागातून गोळा करण्याचे ठरवले .तसेच शाळेसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात मदत करण्याची भावना व्यक्त केली. यावेळी गणेश गांगुर्डे,प्रमोद गांगुर्डे, राहुल गांगुर्डे,विकास गांगुर्डे, दिपक देवरे, साईनाथ बोरसे, मनोज देवरे, दत्तू पगार, गणेश जाधव, गणेश अहिरे, मंगेश अहिरे,ज्ञानेश्वर अहिरे, रवींद्र देवरे, विकास गांगुर्डे समाधान पगार, जनार्दन गांगुर्डे, हेमंत आहेर, भूषण गांगुर्डे, समाधान आहेर,मनोज अहिरे, गोरख अहिरे,नीता गांगुर्डे, ज्योती देवरे, प्रणोती देवरे,मंगल देवरे,शिल्पा गांगुर्डे,गीतांजली देवरे, पूजा गांगुर्डे,ताई अहिरे,दिपाली निकम, मोहिनी गांगुर्डे, बायजा सोनावणे, आशा अहिरे , रुपाली भवर, रोहिणी पवार आदी माजी विद्यार्थी संमेलनासाठी उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या