[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

शिक्षक रतन चौधरी गुरुजीं यांच्या जन्म दिवसानिमित्त त्यांच्या कार्याविषयी एक दृष्टिक्षेप

यांनी लिहिलेले सुभाष कामडी

शिक्षक रतन चौधरी गुरुजीं यांच्या जन्म दिवसानिमित्त त्यांच्या कार्याविषयी एक दृष्टिक्षेप

सार्वजनिक जीवनात वावरताना आपण एक सामाजिक देणं लागतो हि बांधिलकी जपत न्याय,समता,सचोटी,बंधूभाव, आदर, आपल्या समाजात विषयी आपुलकी,आदरभाव, समाजाप्रती नि:स्वार्थी भावना प्रामाणिकपणे काम करत खेडो पाड्यातील जनसामान्यांच्या मनात स्थान निर्माण करून समाजाच्या उन्नतीसाठी सक्रियपणे झटण्याची वृती आणि अचूकपणे निर्णय क्षमता असलेले चौफेर गुणसंपन्न असलेले व्यक्तिमत्व, शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना हवेहवेसे वाटणारे,कडक शिस्तीचे असे एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व म्हणजे सुरगाणा शहरातील शाळा नं.१ चे पदवीधर शिक्षक,मा.प्रभारी तालुका मास्तर,मुख्याध्यपक रतन शिवराम चौधरी यांचा आज जन्म दिवस त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याविषयी घेतलेल्या धांडोळा.रतन शिवराम चौधरी हे एक ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे हाडामासाचे प्राथमिक शिक्षक व कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक म्हणून आज सक्रियपणे कार्यरत आहेत. मार्च १९९० मध्ये एस.एस.सी परिक्षेत तालुक्यात द्वितीय क्रमांकाने उतीर्ण झाल्यावर एप्रिल १९९२ ला पुढे डी. एड चे शिक्षण पूर्ण केले. डिसेंबर १९९२ पासून प्राथमिक शिक्षक म्हणून आज पर्यंत कार्यरत आहेत.शिक्षण हे नोकरीचे मर्यादित नसून समाज परिवर्तनाचे, जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणण्याचे प्रभावी माध्यम आहे. हा भाग ओळखून विद्यार्थी हा केंद्र मानून भविष्यातील भारताचा जबाबदार नागरिक आहे म्हणून विद्यार्थ्यांना वर्गातील पुस्तकी ज्ञान दानाबरोबरच व्यक्तिमत्व विकासाच्या अंगाने काम करणे काळाची गरज ओळखून, प्राथमिक शाळेत वेळोवेळी सहशालेय उपक्रम घ्यावे लागतात त्यात रांगोळी स्पर्धा,निबंध स्पर्धा, शिष्यवृत्ती परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा,एकलव्य माॅडेल स्कूल प्रवेश परीक्षा,संवाद लेखन स्पर्धा, पत्रलेखन स्पर्धा, भाषण स्पर्धा, गीत गायन, कला संगीत, पथनाट्य, एकपात्री, द्विपात्री, क्रीडा स्पर्धा, सामान्य ज्ञान, स्पर्धा परीक्षा,शारीरिक शिक्षण, कार्यानुभव,अशा वेगवेगळे सहशालेय उपक्रमशील व्यक्तिमत्व विकासाच्या
ह्या गोष्टींना महत्त्वाचे स्थान देऊन त्यांनी शाळेत अनेक बदल घडवले आज त्यांचे साडे तीनशेहून अधिक विद्यार्थी शासकीय सेवेत वेगवेगळ्या उच्च पदावर रुजू झाले आहेत.त्यात अभियंता,शिक्षक,वैद्यकीय अधिकारी, व इतर नोकरीच्या सेवेमध्ये रुजू झालेले आहेत ही अभिमानास्पद बाब आहे.
त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून शासनाने अनेक पुरस्कार त्यांना प्रदान केलेले आहेत
*महाराष्ट्र शासन राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार.
*जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कार.
*राष्ट्रीय सेवा विकास मुंबईचा पुरस्कार
*आद्य क्रांतिकारक भाऊ माळेकर शौर्य पुरस्कार (पेठ)
*कोविड योद्धा पुरस्कार 2019 पहिल्या ग्रामीण आदिवासी साहित्य संमेलनाचा प्रेरणा पुरस्कार
*अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटना
*अध्यक्ष सुरगाणा पत्रकार संघटना
पत्रकारिता हा समाज माध्यमाचा आरसा आहे. समाजातील समस्यांना वाचा फोडण्याचं काम पत्रकारितेच्या माध्यमातून होते आज खेडोपाड्यातील समाज बांधव मोठ्या प्रमाणात वाचक प्रिय बनला आहे.चौधरी गुरुजी हे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून सकाळ माध्यम समूहाने पत्रकारितेचे काम सक्रियपणे करत आहेत. अनेक समस्यांवर वृत्तपत्र लेखन केले आहे.
त्यांचे कला, संस्कृती,लोकसाहित्य,लोक परंपरा,चालीरिती यावर लेख वर्तमानपत्रात प्रकाशित झालेले आहेत.आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक म्हणून काम करतांना त्यांनी सर्व आदिवासी अनुसूचित जमातीचा अभ्यास केलेला आहे. सुरगाणा हा गुजरातच्या सीमेवरील तालुका असल्याने येथे डांगी बोली,कोकणी बोली बोलणारा समाज मोठ्या प्रमाणात आहे प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे आदिवासी बोली भाषा संशोधन संस्था अमरावती येथील प्रशिक्षणात डांगी/कोकणी भाषेचा राज्यातील बोली भाषेच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
त्यांनी राज्य शैक्षणिक संस्थेमार्फत विकसित डांगी आणि कोकणी बोलीभाषा शब्दसंग्रह याचा अभ्यास चौधरी गुरुजी यांनी केला आहे.
याशिवाय आदिवासी लोकपरंपरा,सण,उत्सव, रितीरिवाज,पोशाख,पेहराव आदिवासी लोकगीते,नाट्यकला हीच खरी आदिवासी समाजाची ओळख आहे हे मानून त्यांनी कळवण प्रकल्पा अंतर्गत “आदिवासी संस्कृती उगवते दर्शन” हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे.चौधरी गुरुजी यांचे वडील शिवराम चौधरी हे माजी सैनिक असून पूर्वीपासूनच आदिवासी संस्कृतीचे उपासक म्हणून ते ओळखले जातात बोहाडा( भोवाडा)ही पुरातन जुनी आदिवासी लोककला, परंपरा आजही जपत लोक कला जिवंत ठेवण्याचे काम त्यांनी केले आहे.सोंग/मुखवटे ते स्वतः कागदी लगद्यापासून हुबेहूब बनवतात ही लोककला गेल्या प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत राजपथावर ” सुमारे पन्नास आदिवासी तरुणींचा चमूने ” नारि शक्ती वंदन” हा कार्यक्रम यशस्वी केला.
मुंबई,नागपूर, बडोदा, सापुतारा म्युझियममध्ये,
राष्ट्रीय राजधानी दिल्ली, सापुतारा फेस्टिवल, स्टॅच्यू ऑफ युनिटी, गोवा, राजस्थान, छोटा उदेपूर, कणसरा माता चौक नाशिक,आदिवासी संशोधन संस्था पुणे, नागपूर
इथ पर्यंत लोक कला सादर केलेली आहे. त्यासाठी त्यांचा सत्कार चित्रपट अभिनेते सुपर स्टार बिग बी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते झाला आहे.
शेतकरी हा तर जगाचा पोशिंदा आहे.त्याची बरोबरी करणारा कोणी नाही परंतु त्यांच्या व्यथा, वेदना, फळबाग,शेती नुकसान,
ह्या शासन दरबारी वेळोवेळी पोहोचवण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून ते करीत आहेत.त्यासाठी अहोरात्र खेडोपाडी फिरणे, प्रसंगी निर्णय घेणे, महत्त्वाचे ठरते शेतकऱ्यांच्या बाबतीत नुकसान भरपाई, जलपरिषद, वन बंधारे, संकटं काळात मदत,कोरोना काळात ऑक्सिजन बेड उभारणे, डांगी, कोकणी बोली भाषेत समजावून कोरोना विषयीची अनावश्यक भीती दूर करणे, शैक्षणिक,सामाजिक कार्य,अति प्रजन्यवृष्टी,गारपीट,दुष्काळ, पाणीटंचाई,दळणवळणाची सुविधा,रस्ते, इंधन दरवाढ, रोजगार हमी,पर्यटन (गरम पाण्याचे झरे)तातापाणी शासनाच्या वेगवेगळ्या योजना, आरोग्य, पर्यावरण रक्षण ह्या बाबतीत सकाळ पत्रकारितेच्या माध्यमातून व प्रसंगी राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना निवेदन देऊन वेळोवेळी वाचा फोडून जनसामान्य माणसांना चौधरी गुरुजी यांनी सामाजिक न्याय देण्याचे कार्य करत आहेत.
आज त्यांच्या जन्म दिवसानिमित्त खुप खुप हार्दिक शुभेच्छा..
निसर्ग देवते कडून त्यांना निरामय,निरोगी,उदंड आयुष्य लाभो..याच सा-या शुभेच्छा..
शब्दांकन-
शुभेच्छुक श्री.सुभाष कामडी
( संशोधक)

लेखकाबद्दल

सुभाष कामडी

एक टिप्पणी द्या