[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

आदिवासी संस्कृती, शेती, मातीशी नाळ जुळलेले कवी. डॉ मधुचंद्र भुसारे

आमचे कवी/ लेखकमित्र प्रा डॅा.मधुचंद्र भुसारे सर यांना प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.💐💐
यांनी लिहिलेले सुभाष कामडी

आदिवासी संस्कृती, शेती, मातीशी
नाळ जुळलेले कवी. डॉ मधुचंद्र भुसारे

ग्रामीण भागातील सार्वजनिक जीवन आज मोठ्या प्रमाणावर ढवळून निघाले आहे अशातच आदिवासी संस्कृती रीतीरीवाज, बोलीभाषा शैली, आणि एकंदरीत प्रचलित परंपरा बदलते स्थान या विषयावर आज पर्यंत अनेक लेखन , संशोधन होंताना दिसत आहे परंतु ते कवितेतून जपणं महत्त्वाचे आहे .
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला शास्त्र वाणिज्य महाविद्यालय चोपडा मराठी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक, कवी. डॉ.मधुचंद्र लक्ष्मण भुसारे यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांच्या विषयी घेतलेला धांडोळा….
डॉ. मधुचंद्र भुसारे मुळ गाव कोटंबी ता. पेठ जि नाशिक डॉ. भुसारे हे समकालीन आदिवासी साहित्यिक, कवी, लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत त्यांनी ” कोकणा जमातीच्या बोलीचा अभ्यास” या विषयावर २०२१ मध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथून “विद्यावाचस्पती” ( PhD) पदवी प्राप्त केली आहे. त्यांचे आजपर्यंत ७० हुन अधिक संशोधनात्मक लेख राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मासिकातून प्रसिद्ध झाले आहेत.

आमचे कवी/ लेखकमित्र प्रा डॅा.मधुचंद्र भुसारे सर यांना प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.💐💐

आमचे कवी/ लेखकमित्र प्रा डॅा.मधुचंद्र भुसारे सर यांना प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.💐💐

*ग्रंथसंपदा*
* आदोर ( कवितासंग्रह)
* तांडा ( कवितासंग्रह)
* आदिवासी हायकू ( कवितासंग्रह)
* आदिवासी गझल
* फुलोरा ( चारोळी संग्रह)
* बिऱ्हाड (हायकू संग्रह
* खेळ सावल्यांचा (काव्य संग्रह)
* निःशब्द (काव्य संग्रह)
*पुरस्कार*
* भारत सरकारचा डॉ.ए. पी. अब्दुल कलाम पुरस्कार
* महाराष्ट्र शासनाचा गोविंद गारे आदर्श शिक्षक पुरस्कार
* कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव उत्कृष्ट संशोधन पुरस्कार
* ३०हून अधिक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त
* २०२३ मध्ये आँनलाईन भाषा अनुवादित माईक शोध लावल्याबद्दल भारत सरकाचे पेटंट मिळाले आहे.

लेखकाबद्दल

सुभाष कामडी

एक टिप्पणी द्या